मुख्य मजकुरावर जा

circa 1446 BC

Moses & The Exodus

God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.

415 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. निर्गम ८:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    माझे लोक व तुझे लोक यांच्यामध्ये मी फरक करेन. हे चिन्ह उद्याच घडेल.”

  2. निर्गम ८:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि याहवेहने तसेच केले. आणि पाहा, फारोहचा राजवाडा, त्याच्या अधिकार्‍यांची घरे व इजिप्तच्या लोकांची सर्व घरे गोमाश्यांच्या दाट थव्यांनी भरून गेली; आणि गोमाश्यांनी देशाची नासाडी केली.

  3. निर्गम ८:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून म्हटले, “जा, याच देशात तुमच्या परमेश्वराला यज्ञ करा.”

  4. निर्गम ८:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    पण मोशे म्हणाला, “तसे करणे बरे नाही. याहवेह आमच्या परमेश्वराला जो यज्ञ आम्ही करतो तो इजिप्तच्या लोकांना किळसवाणा वाटेल. आणि असा यज्ञ ज्याची ते किळस करतात तो जर आम्ही केला, तर ते आम्हाला धोंडमार करणार नाही काय?

  5. निर्गम ८:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून आम्ही तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊन आमचे परमेश्वर याहवेह आज्ञा देईल त्याप्रमाणे आम्ही बळी अर्पण करू.”

  6. निर्गम ८:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    फारोहने म्हटले, “तुमचा परमेश्वर याहवेह यास रानात जाऊन यज्ञ करावा म्हणून मी तुम्हाला जाऊ देतो, परंतु फार दूर जाऊ नका. आता माझ्यासाठी विनंती करा.”

  7. निर्गम ८:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    मोशे त्याला म्हणाला, “मी तुला सोडून गेल्याबरोबर याहवेहकडे तुझ्यासाठी विनंती करेन, आणि उद्या गोमाशा फारोहस व त्याच्या अधिकार्‍यांस व त्याच्या लोकास सोडून जातील. लोकांनी याहवेहला यज्ञ करण्यास जाऊ नये म्हणून फारोहने पुन्हा फसवणूक करू नये याची त्याने दक्षता घ्यावी.”

  8. निर्गम ८:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    मग मोशे फारोह पुढून निघून गेला व याहवेहकडे विनंती केली,

  9. निर्गम ८:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    व मोशेने जे याहवेहपाशी मागितले त्याप्रमाणे याहवेहने केले. फारोह, त्याचे सेवक व त्याच्या लोकांपासून गोमाशा निघून गेल्या; एक सुद्धा गोमाशी बाकी राहिली नाही.

  10. निर्गम ८:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु यावेळी सुद्धा फारोहने आपले हृदय कठीण केले आणि इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.

  11. निर्गम ९:१सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा व त्याला सांग, ‘इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, “माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.”

  12. निर्गम ९:२सुमारे इ.स.पू. १४९१

    जर तू त्यांना जाण्यास नकार दिला आणि त्यांना धरून ठेवलेस,

  13. निर्गम ९:३सुमारे इ.स.पू. १४९१

    तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल.

  14. निर्गम ९:४सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु याहवेह इस्राएलची जनावरे व इजिप्तची जनावरे यात फरक करतील, असा की इस्राएली लोकांची जनावरे मरणार नाहीत.’ ”

  15. निर्गम ९:५सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने समय नेमून ठेवला व म्हणाले, “याहवेह हे उद्या देशभर घडवून आणतील.”

  16. निर्गम ९:६सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि दुसर्‍या दिवशी याहवेहने तसेच केले: इजिप्त लोकांची सर्व गुरे मरून गेली, परंतु इस्राएल लोकांच्या कळपातील एकही जनावर मेले नाही.

  17. निर्गम ९:७सुमारे इ.स.पू. १४९१

    फारोहने शोध घेतला व जाणून घेतले की इस्राएलातील एकही जनावर मेले नाही, तरीसुद्धा फारोहचे मन बदलले नाही व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.

  18. निर्गम ९:८सुमारे इ.स.पू. १४९१

    नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “भट्टीतून मूठभर राख घेऊन मोशेने ती फारोहच्या देखत हवेत उधळावी.

  19. निर्गम ९:९सुमारे इ.स.पू. १४९१

    व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.”

  20. निर्गम ९:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    तेव्हा त्यांनी भट्टीतील राख घेतली व फारोहसमोर उभे राहून मोशेने ती राख हवेत उधळली, तेव्हा मनुष्यांवर व सर्व जनावरांवर गळवे फुटली.

  21. निर्गम ९:११सुमारे इ.स.पू. १४९१

    मांत्रिक मोशेसमोर उभे राहू शकले नाहीत, कारण त्यांच्याही अंगावर व सर्व इजिप्तच्या लोकांवर गळवे फुटली होती.

  22. निर्गम ९:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    पण याहवेहने फारोहचे मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही.

  23. निर्गम ९:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    मग याहवेह मोशेला म्हणाले, “अगदी पहाटेच ऊठ, फारोहची भेट घे आणि त्याला सांग, इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे.

  24. निर्गम ९:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    नाहीतर यावेळी मी तुम्हा सर्वांवर म्हणजेच तू व तुझे अधिकारी व तुझे लोक या सर्वांवर भयानक पीडा पाठवेन, ज्यामुळे तुझी खात्री होईल की, सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा इतर कोणी नाही.

  25. निर्गम ९:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते.