- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446 BC
Moses & The Exodus
God raises up Moses to confront Pharaoh; the ten plagues culminate in Israel's dramatic deliverance from four centuries of bondage.
या कालखंडातील वचने
- निर्गम ५:१सुमारे इ.स.पू. १४९१
नंतर मोशे व अहरोन फारोहकडे जाऊन त्याला म्हणाले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की रानात जाऊन त्यांनी माझा उत्सव साजरा करावा.’ ”
- निर्गम ५:२सुमारे इ.स.पू. १४९१
यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”
- निर्गम ५:३सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा ते फारोहला म्हणाले, “इब्री लोकांच्या परमेश्वराने आम्हाला दर्शन दिले. आता आम्ही याहवेह, आमच्या परमेश्वराला यज्ञ करावा म्हणून आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊ दे. नाही तर परमेश्वर आम्हाला पीडांनी किंवा तलवारीने मारून टाकेल.”
- निर्गम ५:४सुमारे इ.स.पू. १४९१
यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!”
- निर्गम ५:५सुमारे इ.स.पू. १४९१
मग फारोह म्हणाला, “पाहा, देशाच्या लोकांची संख्या पुष्कळपटीने वाढली आहे आणि तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणत आहात.”
- निर्गम ५:६सुमारे इ.स.पू. १४९१
त्याच दिवशी फारोहने इस्राएलावर नेमलेल्या मुकादमांना व अधिकार्यांना हुकूम दिला:
- निर्गम ५:७सुमारे इ.स.पू. १४९१
“यापुढे लोकांना विटा तयार करण्यासाठी गवत देऊ नका; आपल्यासाठी गवत त्यांनी स्वतःच गोळा करावे.
- निर्गम ५:८सुमारे इ.स.पू. १४९१
तरीही पूर्वी ते जितक्या विटा तयार करीत होते तितक्या त्यांनी केल्याच पाहिजे; त्यात घट होऊ नये. ते आळशी आहेत; म्हणूनच, ‘आम्हाला रानात जाऊन आमच्या परमेश्वराला यज्ञ करू दे,’ अशी ओरड करीत आहेत.
- निर्गम ५:९सुमारे इ.स.पू. १४९१
त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.”
- निर्गम ५:१०सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा मुकादम व पुढारी यांनी इस्राएली लोकांना सांगितले, “फारोहने असे सांगितले आहे की मी तुम्हाला यापुढे गवत देणार नाही.
- निर्गम ५:११सुमारे इ.स.पू. १४९१
तर जाऊन मिळेल तिथून आपल्यासाठी गवत शोधून आणा, मात्र तुमचे काम मुळीच कमी करण्यात येणार नाही.”
- निर्गम ५:१२सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा लोक गवत गोळा करून आणण्यासाठी इजिप्तभर पांगले.
- निर्गम ५:१३सुमारे इ.स.पू. १४९१
मुकादम त्यांना जोर देऊन म्हणत होते, “गवत असताना जेवढे काम करीत होते तितकेच नेमून दिलेले काम रोज झाले पाहिजे.”
- निर्गम ५:१४सुमारे इ.स.पू. १४९१
फारोहच्या मुकादमांनी इस्राएली गटांवर नेमलेल्या पुढार्यांना मार देऊन विचारले, “पूर्वीप्रमाणे, काल व आज तुम्हाला नेमून दिलेले विटा तयार करण्याचे काम तुम्ही का पूर्ण केले नाही?”
- निर्गम ५:१५सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा इस्राएलांचे पुढारी फारोहकडे जाऊन त्याला विनवून म्हणाले, “तुम्ही आपल्या सेवकांशी असे निष्ठुरपणे का वागता?
- निर्गम ५:१६सुमारे इ.स.पू. १४९१
तुमच्या दासांना गवत नाही, तरीही ‘विटा तयार करा!’ असे सांगितले जाते, तुमच्या सेवकांना मारहाण करण्यात येते, परंतु सगळा दोष तुमच्याच लोकांचा आहे.”
- निर्गम ५:१७सुमारे इ.स.पू. १४९१
फारोहने उत्तर दिले, “तुम्ही आळशी लोक आहात—आळशी! म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला याहवेहपुढे यज्ञ करावयास जाऊ द्यावे.’
- निर्गम ५:१८सुमारे इ.स.पू. १४९१
आता आपले काम करा. तुम्हाला गवत पुरविले जाणार नाही, तरी नेमल्याप्रमाणेच विटा तयार करून द्याव्या लागतील.”
- निर्गम ५:१९सुमारे इ.स.पू. १४९१
“तुम्हाला नेमून दिल्याप्रमाणे रोजचे विटा बनविण्याचे काम कमी केले जाणार नाही,” असे ऐकल्यावर आपण अडचणीत सापडलो आहोत, असे इस्राएली पुढाऱ्यांच्या लक्षात आले.
- निर्गम ५:२०सुमारे इ.स.पू. १४९१
फारोहकडून आल्यावर, अहरोन व मोशे आपल्याशी बोलण्यास वाट पाहत आहेत असे त्यांनी पाहिले,
- निर्गम ५:२१सुमारे इ.स.पू. १४९१
ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.”
- निर्गम ५:२२सुमारे इ.स.पू. १४९१
मोशे याहवेहकडे जाऊन म्हणाला, “हे प्रभू, या लोकांवर तुम्ही अरिष्ट का आणले? यासाठीच तुम्ही मला पाठवले आहे का?
- निर्गम ५:२३सुमारे इ.स.पू. १४९१
मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.”
- निर्गम ६:१सुमारे इ.स.पू. १४९१
तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”
- निर्गम ६:२सुमारे इ.स.पू. १४९१
परमेश्वर मोशेला म्हणाले, मी याहवेह आहे.