मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठविले,

  2. येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?”

  3. “हे यरुशलेम, यरुशलेम! संदेष्ट्यांना ठार मारणारे आणि तुझ्याकडे पाठविलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या लेकरांना एकवटण्याची माझी कितीतरी इच्छा होती. पण तुमची नव्हती.

  4. यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमातील लोक त्याच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे.

  5. येशूंनी जे सर्वकाही केले होते ते ऐकून, पुष्कळ लोक त्यांच्याकडे यहूदीया, यरुशलेम, इदूमिया, यार्देन नदीपलीकडील प्रदेश, सोर व सीदोन येथून आले होते.

  6. आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्र शिक्षक म्हणाले, “तो बालजबूलाने पछाडलेला आहे! तो भुतांचा राजा सैतान याच्या साहाय्याने भुते घालवितो.”

  7. परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले.

  8. ते आता यरुशलेमच्या वाटेला लागले असताना, येशू पुढे चालले होते, शिष्य आश्चर्यचकित झाले होते, तर त्यांच्यामागे चालणारे जे इतर लोक होते, ते भयभीत झाले होते. पुन्हा एकदा येशूंनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्या बाबतीत काय घडणार हे त्यांना सांगू लागले.

  9. “आपण यरुशलेमात जात आहोत” ते म्हणाले, “तिथे मानवपुत्राला प्रमुख याजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि गैरयहूदी लोकांच्या स्वाधीन करतील.

  10. ते यरुशलेमजवळ आले आणि जैतून डोंगरावर असलेल्या बेथफगे व बेथानी या गावात आले, तेव्हा येशूंनी आपल्या शिष्यांपैकी दोन शिष्यांना असे सांगून पाठविले,

  11. येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि ते मंदिराच्या अंगणात गेले. त्यांनी सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले, कारण आता उशीर झाला होता, म्हणून आपल्या बारा शिष्यांबरोबर ते बेथानीस गेले.

  12. यरुशलेमला पोहोचल्यावर, येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्‍या सर्वांना ते बाहेर घालवून देऊ लागले. पैशाची अदलाबदल करणार्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणार्‍यांची आसने त्यांनी उधळून लावली.

  13. ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले.

  14. गालीलामध्ये असताना या स्त्रिया येशूंना अनुसरून त्यांची सेवा करीत असत. यरुशलेममधून त्यांच्याबरोबर आलेल्या इतर अनेक स्त्रियाही तिथे होत्या.

  15. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाच्या अर्पणाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला प्रभूला सादर करण्यासाठी यरुशलेमला नेले.

  16. यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता.

  17. तिने त्यावेळी तिथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.

  18. येशूंचे आईवडील दरवर्षी वल्हांडण सणासाठी यरुशलेम येथे जात.

  19. सण संपल्यानंतर येशूंचे आईवडील घरी परत जात असताना, येशू यरुशलेमातच मागे राहिले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती.

  20. पण त्यांना ते कुठेच सापडले नाही, म्हणून ते त्यांना शोधण्यासाठी परत यरुशलेमला गेले.

  21. मग सैतानाने त्याला यरुशलेमास नेऊन मंदिराच्या सर्वात उंच टोकावर उभे केले आणि तो म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक,”

  22. एके दिवशी येशू शिक्षण देत असताना, परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक तिथे बसले होते. ते गालील आणि यहूदीया प्रांतातील प्रत्येक खेड्यातून, तसेच यरुशलेमातूनही आले होते. आजारी लोकांना निरोगी करण्याचे प्रभूचे सामर्थ्य येशूंच्या ठायी होते.

  23. ते खाली आले आणि एका सपाट मैदानावर उभे राहिले. त्यांच्याभोवती शिष्यांचा मोठा समुदाय आणि यरुशलेम, यहूदीया आणि सोर व सीदोन व उत्तरेकडील समुद्रकिनार्‍यांच्या नगरातूनही आलेले अनेक लोक होते.

  24. आणि ते त्यांच्याबरोबर परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे नियोजित केलेल्या व यरुशलेममध्ये येशूंना होणार्‍या प्रयाणासंबंधाने बोलत होते.

  25. येशूंना स्वर्गात वर घेतले जाण्याची वेळ जवळ आली, तेव्हा ते यरुशलेमकडे ठामपणे निघाले.