- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Jerusalem
हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's
31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा
Jerusalem चा उल्लेख असलेली वचने
हे सीयोनकन्ये, तू गीत गा; हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर! अगे यरुशलेमकन्ये, अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर.
त्या दिवशी ते यरुशलेमला असे म्हणतील, “हे सीयोना, भिऊ नकोस, तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस.
मग याहवेहच्या दूताने म्हटले: “हे सर्वसमर्थ याहवेह, गेली सत्तर वर्षे तुम्ही यरुशलेम व यहूदीयाच्या नगरांवर संतापलेले आहात, त्यांच्यावर दया करण्याचे तुम्ही किती वेळ नाकारणार आहात?”
मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे,
“म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी करुणायुक्त होऊन यरुशलेमकडे परत येईन आणि तिथे माझे भवन पुन्हा बांधले जाईल आणि मापनपट्टी यरुशलेमवर ताणली जाईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
“आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ”
मी माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला विचारले, “हे काय आहे?” त्याने उत्तर दिले, “ही शिंगे आहेत, ज्यांनी यहूदीया, इस्राएल आणि यरुशलेम येथील लोकांची पांगापांग केली.”
मी त्याला विचारले, “तू कुठे जात आहेस?” तो म्हणाला, “मी यरुशलेमेचे मोजमाप घेण्यासाठी चाललो आहे. ती किती लांब व किती रुंद आहे हे मला पाहावयाचे आहे.”
व त्याला म्हणाला: “पळत जा आणि त्या तरुणाला सांग, की यरुशलेम तटबंदी नसलेले नगर होईल कारण तिथे असंख्य लोक व जनावरे असतील.
आणि यहूदीया ही पवित्र भूमी याहवेहचे वतन होईल, आणि ते पुन्हा यरुशलेमला निवडतील.
तेव्हा याहवेह सैतानाला म्हणाले, “अरे सैताना, याहवेह तुला धमकावितात! यरुशलेमची निवड करणारे याहवेह तुला धमकावितात! अग्नीतून बाहेर ओढून काढलेल्या जळत्या कोलितासारखा हा मनुष्य नाही का?”
ज्यावेळी यरुशलेम आणि तिच्या सभोवतीची उपनगरात शांती व समृद्ध होती आणि नेगेव व दक्षिणेकडील तळवटीच्या प्रदेशातील लोकांचा तिथे जम बसला होता, त्यावेळीच याहवेहनी संदेष्ट्यांद्वारे लोकांना इशारा दिला नव्हता का?’ ”
याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.”
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पुन्हा एकदा त्या नगरीतील परिपक्व वयाचे स्त्री व पुरुष यरुशलेमच्या रस्त्यांवर बसतील, प्रत्येकजण वयातीत असल्यामुळे आपल्या काठ्या टेकीत येतील,
त्यांनी यरुशलेमात राहावे यासाठी मी त्यांना पुन्हा आणेन; आणि ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा विश्वासयोग्य आणि न्यायी परमेश्वर होईन.”
तर आता मी यहूदीया व यरुशलेमचे परत भले करण्याचा निर्धार केला आहे. तुम्ही भिऊ नका.
आणि पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे देखील यरुशलेमला येतील व सर्वसमर्थ याहवेहकडे विनंती करतील.”
सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!
मी एफ्राईमचे रथ आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन, आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील. आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल. त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्या समुद्रापर्यंत आणि फरात नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.
“मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल.
त्या दिवशी, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे एकत्र होतील, तेव्हा मी यरुशलेमला हालविता न येणारा खडक करेन. जे तिला हालविण्याचा प्रयत्न करतील, उलट ती राष्ट्रेच घायाळ होतील.
“मग यहूदाहची कुळे आपल्या मनात म्हणतील, ‘यरुशलेमचे लोक सामर्थ्यशाली आहेत, कारण सर्वसमर्थ याहवेह त्यांचे परमेश्वर आहेत.’
“त्या दिवशी मी यहूदीयाच्या कुळांना, लाकडाच्या ढिगाऱ्यातील आगटीसारखे, पेंढ्यांमध्ये टाकलेल्या पेटत्या मशालीसारखे करेन; ती कुळे उजवीकडील व डावीकडील सर्व शेजारील राष्ट्रांना जाळून भस्म करतील. यरुशलेम मात्र अचल अशी राहील.
“याहवेह यहूदीयाच्या आवासाला प्रथम वाचवतील, जेणेकरून दावीदाच्या घराण्याचा व यरुशलेमच्या रहिवाशांचा आदर यहूदीयापेक्षा महान होणार नाही.
त्या दिवशी याहवेह यरुशलेमच्या रहिवाशांचे रक्षण करतील, जेणेकरून त्यांच्यातील अत्यंत दुर्बलदेखील दावीद राजासारखे होतील, महापराक्रमी ठरतील. आणि दावीदाचे राजघराणे परमेश्वरासारखे होईल, त्यांच्या अग्रभागी चालणार्या याहवेहच्या दूतासारखे होईल.