मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्या दिवशी यरुशलेमवर हल्ला करणार्‍या सर्व राष्ट्रांना मी नष्ट करण्यास निघेन.

  2. “मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.

  3. त्या दिवशी यरुशलेमातील आकांत इतका मोठा असेल, जसा मगिद्दोच्या खोर्‍यात ठार झालेल्या हदाद-रिम्मोनासाठी होता.

  4. “त्या दिवशी दावीदाच्या घराण्यातून आणि यरुशलेममधील लोकांमधून एक झरा उगम पावेल, तो त्याच्या लोकांना सर्व पापांपासून आणि अशुद्धतेपासून शुद्ध करेल.

  5. मी यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्यास सर्व राष्ट्रांना एकत्र करेन; नगर हस्तगत केले जाईल आणि घरे लुटली जातील, स्त्रियांवर बलात्कार करण्यात येईल. नगरीतील अर्धे लोक बंदिवासात जातील, परंतु उरलेले लोक नगरीतच राहतील.

  6. त्या दिवशी त्यांचे पाय यरुशलेमच्या पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या पर्वतावर उभे राहतील आणि जैतूनांचा पर्वत पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे निर्माण होईल, अर्धा पर्वत उत्तरेकडे व अर्धा पर्वत दक्षिणेकडे सरेल.

  7. त्या दिवशी जीवनजल यरुशलेमातून बाहेर वाहील, त्यातील अर्धे पूर्व दिशेला मृत समुद्राकडे व अर्धे पश्चिम दिशेला भूमध्यसुमद्राकडे वाहतील, उन्हाळ्यात व हिवाळ्यात ते निरंतर वाहत राहतील.

  8. यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्‍याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.

  9. तिच्यात लोकवस्ती होईल; पुन्हा कधीही तिचा नाश होणार नाही. यरुशलेम सुरक्षित होईल.

  10. जे लोक यरुशलेमविरुद्ध लढले, त्या सर्व लोकांवर याहवेह ही मरी पाठवतील: स्वतःच्या पायावर उभे असतानाच त्यांचे मांस सडत जाईल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचेत सडतील, आणि त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडातच सडतील.

  11. यहूदीयाही यरुशलेमात लढेल. शेजारच्या सर्व राष्ट्रांची संपत्ती—सोने आणि रुपे व तलम कपडे यांचे मोठमोठे साठे जप्त केले जातील.

  12. मग ज्यांनी यरुशलेमवर आक्रमण केले त्या सर्व राष्ट्रातून वाचलेले अवशिष्ट लोक प्रत्येक वर्षी वर यरुशलेमला राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची भक्ती करण्यास, मंडपाचा सण पाळण्यास व आराधना करण्यास जातील.

  13. आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.

  14. यरुशलेम व यहूदीयातील प्रत्येक पातेले सर्वसमर्थ याहवेहला पवित्र वाटेल; आराधना करण्यासाठी येणारे लोक त्यातील पात्र घेऊन व त्यात त्यांची अर्पणे शिजवतील. यापुढे सर्वसमर्थ याहवेहच्या भवनात कोणीही कनानी नसतील.

  15. यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे.

  16. मग पूर्वीच्या दिवसाप्रमाणे आणि गतवर्षासारखे पुन्हा एकदा यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी आणलेली अर्पणे याहवेहस मान्य होतील.

  17. येशूंचा जन्म हेरोद राजाच्या कारकिर्दीत, यहूदीया प्रांतातील बेथलेहेम नावाच्या गावी झाल्यानंतर, पूर्वेकडून खगोलशास्त्रज्ञ यरुशलेमात आले.

  18. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले.

  19. यरुशलेम, सर्व यहूदीया आणि यार्देन प्रांतातील प्रत्येक भागातून लोक त्यांच्याकडे आले.

  20. गालील प्रांत, दकापलीस, यरुशलेम, यहूदीया आणि यार्देन पलीकडील प्रदेशातून येथूनही मोठा समुदाय त्यांच्यामागे आला.

  21. किंवा पृथ्वीची, कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे,

  22. परूशी आणि यरुशलेमहून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंकडे येऊन विचारू लागले,

  23. तेव्हापासून, येशू आपल्या शिष्यांना सांगू लागले की त्यांनी यरुशलेमास जाणे, वडील व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून अनेक दुःख सहन करणे, जिवे मारले जाणे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत होणे हे अगत्य आहे.

  24. येशू यरुशलेमला जात होते. वाटेत त्यांनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला घेतले आणि त्यांना म्हटले,

  25. “आपण यरुशलेमात जात आहोत आणि तिथे मानवपुत्राला महायाजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि नंतर त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल.