मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काही काळानंतर, येशू यहूद्यांच्या सणांपैकी एकास यरुशलेम येथे गेले.

  2. आता यरुशलेम शहरात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे; त्याला अरामी भाषेत बेथेस्दा म्हणतात आणि या तळ्याभोवती छप्पर असलेल्या खांबांच्या पाच पडव्या होत्या.

  3. यरुशलेममध्ये राहणारे काही लोक एकमेकास विचारू लागले, “ज्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत तो हाच मनुष्य नाही काय?

  4. ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा सण होता.

  5. बेथानी हे गाव यरुशलेमपासून दोन मैलापेक्षा कमी अंतरावर होते.

  6. जेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला, तेव्हा सण सुरू होण्यापूर्वी शुद्धीकरणाचा विधी पार पाडावा म्हणून देशातील अनेक लोक वर यरुशलेममध्ये आले होते

  7. दुसर्‍या दिवशी येशू यरुशलेमला येत आहेत ही बातमी वल्हांडण सणासाठी आलेल्या मोठ्या समुदायाने ऐकली.

  8. अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेल्या ज्या देणगीबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा.

  9. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.”

  10. नंतर प्रेषित सुमारे शब्बाथ दिवसाच्या वाटचालीवर अंतरावर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर होते तिथून ते यरुशलेमला परत आले.

  11. ही वार्ता यरुशलेमात राहणार्‍या सर्वांना समजली, तेव्हापासून त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले.

  12. त्यावेळेस आकाशाखालील प्रत्येक देशामधून आलेले भक्तिमान यहूदी यरुशलेममध्ये राहत होते.

  13. त्यावेळी पेत्र अकरा प्रेषितांसह उभा राहून, त्या जमावाला उद्देशून मोठ्याने म्हणाला: “यरुशलेममधील यहूदी बंधूंनो आणि रहिवाशांनो, तुम्हाला या गोष्टी स्पष्ट समजणे आवश्यक आहे; म्हणून माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका.

  14. “आपण या मनुष्यांचे काय करावे?” ते म्हणाले, “यरुशलेमकरांना माहीत आहे की त्यांनी हा असाधारण चमत्कार करून दाखविला आहे आणि आम्ही हे नाकारू शकत नाही.

  15. यरुशलेमच्या आसपासच्या गावातून लोकसमुदाय येताना त्यांच्याबरोबर आजारी व अशुद्ध आत्म्यांनी पीडलेल्यांना आणत होते आणि ते सर्वजण बरे होऊन जात.

  16. ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.”

  17. मग परमेश्वराच्या वचनाचा प्रसार झाला. यरुशलेममध्ये शिष्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढली आणि अनेक याजकांनी देखील मोठ्या संख्येने विश्वासाचे आज्ञापालन केले.

  18. स्तेफनाच्या वधाला शौलाने मान्यता दिली. त्या दिवसापासून यरुशलेम येथील मंडळीचा मोठा छळ सुरू झाला आणि प्रेषितांशिवाय सर्व विश्वासणारे यहूदीया व शोमरोन या प्रांतात पांगले.

  19. यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले.

  20. आणखी प्रभूचे वचन गाजवून व येशूंबद्दल साक्ष देऊन पेत्र व योहान यरुशलेमला परतले. परत जाताना रस्त्याने शोमरोनातील अनेक खेड्यांमध्ये थांबून त्यांनी तेथील लोकांना शुभवार्ता सांगितली.

  21. आता प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ दक्षिणेकडील रस्त्यावर जा, तो वाळवंटातून जाणारा रस्ता यरुशलेमपासून गाझाकडे जातो.”

  22. तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता,

  23. आणि दिमिष्क येथील सभागृहासाठी अशी पत्रे मागितली की, हा मार्ग अनुसरणारे कोणीही पुरुष किंवा स्त्रिया जर त्याला दिसून आले तर त्यांना बंदिवान करून यरुशलेमेत न्यावे.

  24. हनन्याह म्हणाला, “प्रभूजी! यरुशलेममधील तुझ्या पवित्र लोकांना या मनुष्याने किती नुकसान पोहोचविले आहे, याचा वृतांत मी अनेकांकडून ऐकला आहे.

  25. ज्यांनी त्याची शुभवार्ता ऐकली, ते सर्वजण आश्चर्याने थक्क झाले आणि विचारू लागले, “यरुशलेममध्ये येशूंच्या नावाने धावा करणार्‍यांची धूळधाण करणारा मनुष्य तो हाच नव्हे काय आणि तो येथे त्यांना कैद करून महायाजकांकडे नेण्यासाठी आलेला होता, हे खरे आहे ना?”