मुख्य मजकुरावर जा

Simeon

40 वचने · 20 कुटुंब सदस्य

Simeon चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.”

  2. परंतु तीन दिवसानंतर, त्यांच्या जखमांमुळे ते वेदनेत असताना, याकोबाच्या पुत्रांपैकी दीनाचे दोन भाऊ शिमओन व लेवी, यांनी आपल्या हाती तलवारी घेतल्या, ते बेसावध असलेल्या शहरात शिरले आणि त्यांनी तेथील प्रत्येक पुरुषाची कत्तल केली.

  3. तेव्हा याकोब, शिमओन व लेवी यांना म्हणाला, “या भूमीतील सर्व कनानी व परिज्जी लोकांना माझी किळस येईल असे वर्तन तुम्ही केले आहे. आपण अगदी थोडके आहोत; ते आपल्यावर चालून येतील आणि आपल्याला चिरडून टाकतील व आपण सर्वजण मारले जाऊ.”

  4. लेआचे पुत्र: याकोबाचा ज्येष्ठपुत्र रऊबेन, मग शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून.

  5. तो तिथून बाहेर पडला व रडू लागला, थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने शिमओनाची निवड करून त्याला त्यांच्या डोळ्यांसमक्ष बांधून घेतले.

  6. मग याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या मुलांना हिरावून घेतले आहे. योसेफ राहिला नाही, शिमओन गेला; आता तुम्ही बिन्यामीनालाही नेणार; सर्वकाही माझ्या विरुद्धच घडत आहे.”

  7. “ते सर्व ठीक आहे,” तो म्हणाला, “घाबरू नका. तुमचा परमेश्वर, तुमच्या पित्याचा परमेश्वर यांनीच तुमच्या पोत्यात ते धन दिले आहे; तुमची चांदी मला मिळाली आहे.” मग त्याने शिमओनाला बाहेर काढून त्यांच्याकडे आणले.

  8. शिमओनाचे पुत्र: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.

  9. “आता मी इजिप्तमध्ये तुझ्याकडे येण्यापूर्वी तुला इजिप्तमध्ये झालेले दोन पुत्र माझेच गणले जातील; जसे रऊबेन व शिमओन तसेच एफ्राईम व मनश्शेह हेदेखील माझेच आहे.

  10. “शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत, त्यांची तलवार ही अत्याचाराचे साधन आहे.

  11. रऊबेन, शिमओन, लेवी आणि यहूदाह;

  12. शिमओनाचे पुत्र हे: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीचा पुत्र शौल.

  13. शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;

  14. शिमओनाच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष व जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंबानुसार नोंदण्यात आली.

  15. शिमओनाच्या गोत्रांची संख्या 59,300 होती.

  16. शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे.

  17. पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले.

  18. सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता.

  19. शिमओन गोत्रातील होरीचा पुत्र शाफाट;

  20. शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: नेमूएलपासून नेमूएली कूळ; यामीनपासून यामीनी कूळ; याकीनपासून याखीनी कूळ;

  21. शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल;

  22. तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.

  23. दुसरी चिठ्ठी शिमओन गोत्राच्या कुळानुसार निघाली. त्यांचे वतन यहूदीयाच्या सीमेमध्ये होते.

  24. आणि बालथ-बीर (नेगेवमधील रामोथ) पर्यंत असलेली सर्व नगरे व सभोवतालची गावे.

  25. शिमओन गोत्राच्या वतनाचा हिस्सा यहूदीयाच्या वतनातून घेतला होता, कारण यहूदाहचा भाग त्यांच्या गरजेपेक्षा मोठा होता. त्यामुळे शिमओन वंशाला त्यांचे वतन यहूदाह वंशाच्या सीमेमध्ये मिळाले.