The Tribe Of Simeon बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
लवकरच ती पुन्हा गर्भवती झाली आणि तिला दुसरा पुत्र झाला. तिने त्याचे नाव शिमओन असे ठेवले, कारण ती म्हणाली, “याहवेहने माझे ऐकले आहे, मी नावडती आहे म्हणून त्यांनी मला आणखी एक पुत्र दिला.”
“शिमओन व लेवी हे दोघे भाऊ आहेत, त्यांची तलवार ही अत्याचाराचे साधन आहे.
मी त्यांच्या सभेमध्ये जाऊ नये, त्यांच्या मंडळीमध्ये मी सामील होऊ नये, कारण रागाच्या भरात त्यांनी माणसांचा वध केला, आणि वाटेल तसे बैलांची धोंडशीर तोडली.
त्यांचा क्रोध शापित असो, आणि त्यांचा संताप, किती क्रूर आहे! मी त्यांची याकोबामध्ये पांगापांग करेन, आणि त्यांना इस्राएलभर पांगवून टाकेन.
शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;
शिमओनाच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष व जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंबानुसार नोंदण्यात आली.
शिमओनाच्या गोत्रांची संख्या 59,300 होती.
शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे.
त्यांच्या दलातील लोकांची संख्या 59,300 होती.
पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले.
त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
पापार्पणासाठी एक बोकड;
आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.
त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचा दल आपल्या झेंड्याखाली पुढे निघाला. शदेयुराचा पुत्र एलीसूर त्यांचा सेनापती होता.
सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल हा शिमओन वंशाच्या दलावर होता.
शिमओन गोत्रातील होरीचा पुत्र शाफाट;
परंतु त्या पीडेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांची संख्या चोवीस हजार होती.
मिद्यानी स्त्रीबरोबर ज्या इस्राएली पुरुषाला जिवे मारण्यात आले, त्याचे नाव जिम्री होते, जो शिमओनी घराण्याचा पुढारी सालूचा पुत्र होता.
शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: नेमूएलपासून नेमूएली कूळ; यामीनपासून यामीनी कूळ; याकीनपासून याखीनी कूळ;
जेरहपासून जेरही कूळ; शाऊलपासून शाऊली कूळ.
ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली.
शिमओनच्या गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र शमुवेल;
तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.