मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. क्रोध सहन करावा म्हणून परमेश्वराने आपली निवड केली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपले तारण व्हावे म्हणून केली आहे.

  2. सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.

  3. परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत.

  4. परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,

  5. परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.

  6. बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे.

  7. यास्तव, तुम्ही सर्व छळांमध्ये आणि परीक्षांमध्ये जो धीर दाखविला आणि त्यामध्ये तुम्ही जी चिकाटी आणि विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या मंडळ्यांमध्ये अभिमानाने सांगतो.

  8. परमेश्वराचा न्याय योग्य आहे, याचे हे सर्व प्रमाण आहे आणि याचा परिणाम म्हणजे ज्या परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्यासाठी तुम्ही पात्र ठरावे.

  9. परमेश्वर न्यायी आहेत: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील.

  10. जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंची शुभवार्तेचे पालन करीत नाहीत, त्यांना ते शिक्षा देतील.

  11. हे लक्षात ठेऊन, आपल्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या पाचरणासाठी योग्य करावे आणि सर्व चांगुलपणाची प्रत्येक इच्छा आणि विश्वासाच्या प्रत्येक कृत्याच्या सामर्थ्याने पूर्ण करावे, अशी आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो.

  12. प्रभू येशूंच्या नावाचे गौरव तुमच्यामध्ये आणि तुमचे त्यांच्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने व्हावे ही आमची प्रार्थना आहे.

  13. तो तथाकथित देव किंवा भजनीय वस्तूंचा विरोध करेल व या सर्वांहून स्वतःला उंच करेल, तो परमेश्वराच्या मंदिरात बसेल व मीच परमेश्वर आहे, असे जाहीर करेल.

  14. या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील,

  15. परंतु प्रभूला प्रिय असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुमच्यासाठी परमेश्वराची सतत उपकारस्तुती केली पाहिजे, कारण परमेश्वराने तुम्हाला आत्म्याद्वारे होणार्‍या पवित्रीकरणाच्या कार्यात व सत्यावरील विश्वासात प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.

  16. ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त,

  17. प्रभू तुमची अंतःकरणे परमेश्वराच्या प्रीतिकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.

  18. परमेश्वर आपले तारणकर्ता व ख्रिस्त येशू आपली आशा, यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूंचे प्रेषित म्हणून नेमलेला पौल याजकडून,

  19. विश्वासातील माझा खरोखरचा पुत्र तीमथ्य यास,

  20. जे धन्यवादित परमेश्वराच्या गौरवाशी संबंधित शुभवार्तेला सुसंगत आहे, ते माझ्याकडे सोपविण्यात आले आहे.

  21. जे सर्वकाळचे राजा, अविनाशी व अदृश्य असे एकच परमेश्वर यांना सदासर्वकाळ सन्मान आणि गौरव असो. आमेन.

  22. असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्‍याला संतोष होतो.

  23. कारण एकच परमेश्वर आहे आणि परमेश्वर व मनुष्य यामध्ये मनुष्य ख्रिस्त येशू हेच एकमेव मध्यस्थ आहे.

  24. (ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तर तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल?)

  25. जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.