God
God चा उल्लेख असलेली वचने
नम्र लोक पुन्हा याहवेहच्या सानिध्यात हर्षोल्हास करतील; गरजवंत इस्राएलचे पवित्र परमेश्वराच्या सानिध्यात आनंद साजरा करतील.
म्हणूनच अब्राहामाचा उद्धार करणारे याहवेह, याकोबाच्या वंशजांना म्हणतात: “येथून पुढे याकोब लज्जित होणार नाही. येथून पुढे त्यांचे चेहरे पांढरेफटक पडणार नाहीत.
जेव्हा ते त्यांच्यामध्ये त्यांची संतती, माझी हस्तकृती बघतील, तेव्हा ते माझे नाव पवित्र ठेवतील; ते याकोबच्या पवित्र परमेश्वराची पवित्रता स्वीकारतील आणि इस्राएलच्या परमेश्वराचा आदर करतील.
याहवेह असे घोषित करतात, “दुराग्रही संततीचा धिक्कार असो, ज्या योजना माझ्या नाहीत, त्या ते पूर्ण करतात, नाते जोडतात, परंतु माझ्या आत्म्याने नाही, पापावर पापाचा ढीग रचतात;
जे माझा सल्ला न घेता इजिप्तकडे जातात; जे आश्रयासाठी इजिप्तच्या सावलीची फारोहच्या रक्षणासाठी मदतीची अपेक्षा करतात.
कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.
हा मार्ग सोडा, या वाटेवरून दुसरीकडे जा, आणि इस्राएलचे जे पवित्र परमेश्वर आहेत त्यांच्याबरोबर आमची समोरासमोर भेट करणे थांबवा!”
त्यामुळे इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात: “कारण तुम्ही हा संदेश नाकारला, जुलूम करण्यावर भरवसा ठेवला आणि कपट करण्यावर अवलंबून राहिला,
मातीच्या भांड्यांसारखे त्याचे इतक्या निर्दयीपणाने तुकडे केले जातील की त्याच्या अनेक बारीक तुकड्यांमध्ये चुलीमधून निखारे घेण्यासाठी किंवा रांजणातून पाणी काढण्यासाठी एकही तुकडा सापडणार नाही.”
सार्वभौम याहवेह, इस्राएलचे पवित्र परमेश्वर असे म्हणतात: “पश्चात्ताप आणि विश्रांती करणे हेच तुमचे तारण आहे, शांतता राखणे आणि विश्वास ठेवणे यामध्ये तुमचे सामर्थ्य आहे, परंतु यापैकी तुम्हाकडे काहीही नसेल.
तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात; त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील. कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत. धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!
यरुशलेममध्ये राहणाऱ्या सीयोनच्या लोकांनो, तुम्ही यापुढे रडणार नाही. जेव्हा तुम्ही मदतीसाठी हाक माराल, तेव्हा ते किती दयाळू असतील! तुमची हाक ऐकताच ते तुम्हाला उत्तर देतील.
जरी प्रभू तुम्हाला आपत्तीची भाकर आणि वेदनेचे पाणी देत असले, तरी तुमचे शिक्षक यापुढे लपून राहणार नाहीत; तुम्ही त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल.
तुम्ही जमिनीत जे बीज पेरता, त्यासाठी ते तुमच्याकडे पाऊससुद्धा पाठवतील आणि त्या जमिनीतून येणारे धान्य पौष्टिक आणि विपुल असेल. त्या दिवशी तुमची गुरे विस्तीर्ण कुरणांमध्ये चरतील.
जेव्हा याहवेह त्यांच्या लोकांच्या जखमांना बांधतील आणि त्यांनी दिलेल्या जखमा बरे करतील, तेव्हा चंद्र सूर्यासारखा चमकेल आणि सूर्यप्रकाश सात पटीने तेजस्वी होईल, सात पूर्ण दिवसांच्या प्रकाशासारखा तो असेल.
पहा, धगधगत्या क्रोधाने आणि धुराच्या दाट ढगांबरोबर, याहवेहचे नाव फार लांबून येत आहे; त्यांचे ओठ क्रोधाने भरलेले आहेत, आणि त्यांची जीभ भस्म करणारा अग्नी आहे.
त्यांचा श्वास जलदगतीने येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यासारखा आहे, तो गळ्यापर्यंत वर येतो. ते नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना हादरवितात; ते लोकांच्या जबड्यात लगामाचा भाग ठेवतात जो त्यांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातो.
आणि तुम्ही जसे रात्रीच्या वेळेस पवित्र सण साजरा करता त्याप्रमाणे तुम्ही गाणी गाल; जेव्हा लोक बासरी वाजवित याहवेहच्या पर्वताकडे वर इस्राएलच्या खडकाकडे जातात, तेव्हा तुमची अंतःकरणे आनंदित होतील.
याहवेह त्यांची उदात्त वाणी लोकांना ऐकवतील आणि घोर संतापाने आणि भस्मसात करणाऱ्या अग्नीने, ढगफुटी, वादळ आणि गारा यांच्याबरोबर त्यांची भुजा खाली येत असताना लोक पहातील.
याहवेहचा आवाज अश्शूरला हादरून टाकेल; ते त्यांच्या काठीने त्यांना तडाखा देतील.
याहवेह त्यांच्याकडील शिक्षेच्या दांड्याने त्यांच्यावर दिलेला प्रत्येक प्रहार डफ आणि वीणा यांच्या संगीतावर असेल, जसे ते त्यांच्या हाताच्या तडाख्याने युद्धामध्ये त्यांच्याशी लढतात.
तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे; ते राजासाठी तयार केलेले आहे. त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे, त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे; जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा, याहवेहचा श्वास ते पेटवितो.
जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात, जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो, जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात, परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत, किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.
तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात. ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत. जे दुष्टांना मदत करतात त्यांच्याविरुद्ध ते त्या दुष्ट राष्ट्राविरुद्ध उठाव करतील,
परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत; त्यांचे घोडे मांसाचे आहेत आणि आत्म्याचे नाहीत. जेव्हा याहवेह त्यांचा हात पुढे करतात तेव्हा जे मदत करणारे ते अडखळतील, ज्यांना मदत मिळाली आहे ते पडतील. सर्वजण एकत्र नाश पावतील.