God
God चा उल्लेख असलेली वचने
याहवेह मला असे म्हणतात: “जसा सिंह गुरगुरतो, एक मोठा सिंह त्याच्या भक्ष्यावर— आणि त्याला विरोध करण्यासाठी जरी मेंढपाळांची संपूर्ण टोळी एकत्र बोलावली जाते, तरी तो त्यांच्या ओरडण्याने घाबरत नाही किंवा त्यांच्या मोठ्या गोंधळ्याच्या आवाजाने अस्वस्थ होत नाही, म्हणून सर्वसमर्थ याहवेह सीयोन पर्वतावर आणि त्याच्या उंचीवर युद्ध करण्यासाठी खाली येतील.
ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात, त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील; ते तिला संरक्षण देऊन सोडवतील, ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.”
अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.
दहशतीमुळे त्यांचा किल्ला पडून जाईल; युद्धाच्या ध्वजाचे दृश्य पाहून त्यांचे सेनापती भयभीत होतील,” ज्या याहवेहचा अग्नी सीयोनमध्ये आहे, ज्यांची भट्टी यरुशलेममध्ये आहे, ते अशी घोषणा करतात.
मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात, त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते: ते देवहीनतेची कृत्ये करतात आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात; भुकेल्यांना ते उपाशी सोडतात आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात.
आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील— होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी, व चैनबाजी करणार्या या शहरांसाठी विलाप करा.
माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली आणि सुरक्षित असतील, त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील.
हे याहवेह, आम्हावर कृपा करा; आम्ही तुमची आस धरलेली आहे. रोज सकाळी तुम्ही आमचे सामर्थ्य व्हा, संकटाच्या वेळी आमचे तारण व्हा.
तुमच्या सैन्याच्या रणगर्जनेने लोक पलायन करतात. जेव्हा तुम्ही युद्धासाठी सज्ज होता, तेव्हा राष्ट्रांची पांगापांग होते.
याहवेहना उच्च केले आहे, कारण ते उच्चस्थानी राहतात; सीयोनला ते त्यांच्या न्यायाने आणि धार्मिकतेने भरून टाकतील.
तुमच्या वेळेसाठी ते निश्चित पाया असे असतील, तारण, शहाणपण आणि सुज्ञान यांचे ते विपुल भांडार असतील; याहवेहचे भय हेच या खजिन्याची चावी आहे.
याहवेह म्हणतात, “मी आता उठेन, मी आता उच्च केल्या जाईन; आता मला उंच केले जाईल.
तुम्ही जे फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका. तुम्ही जे जवळ आहात ते, माझे सामर्थ्य मान्य करा!
आमचे प्रतापी याहवेह तिथे असतील. विस्तीर्ण नद्या आणि प्रवाह असलेले ते ठिकाण असेल. कोणत्याही लहान जहाजाचे वल्हे त्यांच्यावर स्वार होणार नाही, कोणतेही प्रचंड जहाज त्यांच्यावरून जाणार नाही.
कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत, याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत, याहवेह आमचे राजा आहेत; तेच आम्हाला वाचविणार आहेत.
याहवेह सर्व राष्ट्रांवर रागावले आहेत; त्यांचा क्रोध सर्व सैन्यांवर आला आहे. ते त्यांचा संपूर्णपणे नाश करतील, ते त्यांना वध करणाऱ्यांकडे सोपवून देतील.
माझी तलवार आकाशांमध्ये पिऊन तृप्त झाली आहे. पाहा, एदोमावर न्यायनिवाडा करण्यासाठी ती उतरत आहे, त्या लोकांचा मी संपूर्णपणे नाश केला आहे.
याहवेहच्या तलवारीने रक्तात आंघोळ केली आहे, ती चरबीने झाकलेली आहे— कोकरे आणि शेळ्यांचे रक्त, मेंढ्यांच्या मूत्रपिंडाच्या चरबीने ती झाकली आहे. कारण याहवेहसाठी बस्रा येथे अर्पणे आणि एदोम देशात मोठे यज्ञबली केले आहेत.
कारण याहवेहकडे सूड घेण्याचा एक दिवस आहे, सीयोनला पाठिंबा देण्यासाठी शिक्षा देणारे वर्ष.
ससाणे आणि साळू त्याचा ताबा घेतील; मोठी घुबडे आणि डोमकावळे तिथे घरटी बांधतील. कारण परमेश्वराने एदोमच्या भूमीवर मापनदोरी ताणली आहे आणि नाशाचा ओळंबा लावला आहे.
याहवेहच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत पाहा आणि वाचा: यामधील कोणाचाही अभाव होणार नाही, एकालाही जोडीदाराची कमतरता पडणार नाही. कारण ही त्यांच्याच मुखाने दिलेली आज्ञा आहे, आणि त्यांचा आत्मा त्यांना एकत्र करेल.
ते त्यांच्या भागांचे वाटप करतात; त्यांच्या हाताने त्यांना मोजून वाटतात. तो भाग सर्वकाळासाठी त्यांच्याकडे राहील आणि ते पिढ्यान् पिढ्या तिथे निवास करतील.
त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.
भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”
आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील. ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील; अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल. हर्ष व उल्हासाने ते भरून जातील, दुःख व शोक दूर पळून जातील.