मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी रागावलेलो नाही. परंतु जर माझ्यासमोर काटेरी झुडपे आणि काटे आले तर! मी त्यांच्यावर हल्ला करून युद्ध केले असते; मी त्या सर्वांना आग लावली असती.

  2. नाहीतर त्यांना माझ्याकडे आश्रय घेण्यासाठी येऊ द्या; त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा, होय, त्यांनी माझ्याबरोबर सलोखा करावा.”

  3. याहवेहनी तिच्यावर हल्ला केला आहे का, ज्यांनी तिच्यावर हल्ला केला, तिच्यावर याहवेहने हल्ला केला होता का? तिला मारण्यात आले आहे का, ज्यांनी तिला मारले, त्यांना मारण्यात आले आहे का?

  4. रणनीती आणि बंदिवास करून तुम्ही तिच्याबरोबर वाद घालता— जसे एखाद्या दिवशी पूर्वेचा वारा वाहतो, तसे त्यांच्या हिंसक स्फोटाने ते तिला घालवून देतात.

  5. तेव्हा याप्रकारे याकोबाच्या अपराधाचे प्रायश्चित्त होईल, आणि त्याचे पाप काढून टाकल्याचे हे पूर्ण फळ असेल: जेव्हा ते वेदीच्या सर्व दगडाचे चुनखडीसारखे चूर्ण करतील. अशेरा दैवतेचे स्तंभ किंवा धूपवेद्या तशाच उभ्या सोडतील.

  6. जेव्हा झाडाच्या फांद्या वाळून शुष्क होतात व मोडतात आणि स्त्रिया येतात व ते सरपण म्हणून जाळतात. तसे हे लोक असमंजस आहेत; म्हणून त्यांना घडविणाऱ्याला त्यांची दया येत नाही आणि त्यांचा निर्माणकर्ता त्यांच्यावर कृपा करीत नाही.

  7. त्या दिवशी याहवेह वाहत्या फरात नदीपासून इजिप्तच्या खोऱ्यापर्यंत मळणी करतील आणि तुम्ही, इस्राएल एकएक करून गोळा केले जाल.

  8. आणि त्या दिवशी मोठा कर्णा वाजू लागेल. ज्यांचा अश्शूरमध्ये नाश होत होता आणि जे इजिप्तमध्ये बंदिवासात गेले होते, ते येतील आणि यरुशलेममधील पवित्र पर्वतावर याहवेहची उपासना करतील.

  9. पाहा, प्रभूकडे असा एकजण आहे जो सामर्थ्यवान आणि बलवान आहे. तो गारपीट आणि विध्वंस करणाऱ्या वावटळीसारखा, वेगाने फटकारणारा पाऊस आणि पूरासारखा मुसळधार पाऊस, तो पूर्णशक्तीने त्याला जमिनीवर फेकून देईल.

  10. त्या दिवशी सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या अवशिष्ट लोकांसाठी एक गौरवशाली मुकुट, सुंदर पुष्पचक्र असे होतील.

  11. ठीक आहे, तर परदेशी ओठांनी आणि अपरिचित वाणीने परमेश्वर या लोकांशी बोलतील,

  12. ज्यांना ते असे म्हणाले, “हे विश्रांती घेण्याचे ठिकाण आहे, थकलेल्यांना विश्रांती घेऊ द्या;” आणि, “ही विश्राम करण्याची जागा आहे;” परंतु ते ऐकणार नाहीत.

  13. म्हणून याहवेहचे वचन त्यांच्याकरिता असे होईल: हे करा, ते करा, यासाठी एक नियम, त्यासाठी एक नियम; थोडेसे इकडे, थोडेसे तिकडे— जेणेकरून ते मागे पडतील; ते जखमी होतील, सापळ्यात अडकतील व पकडले जातील.

  14. म्हणून, जे यरुशलेमच्या लोकांवर राज्य करतात, त्या उपहास करणार्‍या अधिकार्‍यांनो, याहवेहचे वचन ऐका:

  15. म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी सीयोनमध्ये एक दगड ठेवतो, एक परीक्षा घेतलेला दगड, खात्रीपूर्वक पायासाठी मौल्यवान कोनशिला; त्यावर भिस्त ठेवणारा, कधीही भीतीने त्रस्त होत नाही.

  16. मी न्यायाला मापनदोरी आणि नीतिमत्वाला ओळंबा असे करेन. गारांनी तुमचा खोटेपणा, तुमचे आश्रयस्थान झाडून काढला जाईल, आणि पाणी तुमच्या लपण्याच्या जागेवर भरून वाहील.

  17. त्यांचे कार्य करण्यासाठी, त्यांचे विक्षिप्त काम, आणि त्यांचे कठीण कार्य, होय, त्यांचे अद्भुत कार्य सिद्ध करण्यासाठी, जसे ते पेराझीम पर्वतावर राहिले होते, तसे याहवेह उभे राहतील, जसे गिबोनच्या खोऱ्यामध्ये केले होते, तसे स्वतःला उभारतील.

  18. आता तुमचे थट्टा करणे थांबवा, नाहीतर तुमच्या साखळ्या आणखीच जड होतील. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांनी मला सांगितले आहे, संपूर्ण भूमीचा नाश करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.

  19. त्याचे परमेश्वर त्याला सूचना देतात आणि त्याला योग्य रीत शिकवितात.

  20. ही सर्व माहिती सर्वसमर्थ याहवेहकडून प्राप्त होते. त्यांच्या योजना चमत्कारिक असतात, त्यांचे ज्ञान अद्भुत आहे.

  21. सर्वसमर्थ याहवेह येतील मेघगर्जना आणि भूकंप आणि प्रचंड गर्जनेसह, सोसाट्याच्या वाऱ्याची वावटळ, वादळ आणि गिळंकृत करणाऱ्या अग्निज्वालांसह येतील.

  22. याहवेहनी तुम्हाला गाढ झोप आणली आहे: त्यांनी संदेष्टे, म्हणजे तुमचे डोळे बंद केले आहेत; त्यांनी दृष्टान्त पाहणारे, म्हणजे तुमच्या डोक्यावर आच्छादन घातले आहे.

  23. प्रभू असे म्हणतात: “हे लोक केवळ त्यांच्या मुखाने माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.

  24. म्हणून मी पुन्हा एकदा या लोकांना विस्मित करेन. चमत्कारानंतर चमत्कार करून; ज्ञानी लोकांचे ज्ञान नष्ट होईल, बुद्धिमानाची बुद्धी नाहीशी होईल.”

  25. धिक्कार असो, जे त्यांच्या योजना याहवेहपासून लपविण्यासाठी खूप खोलवर जातात, जे त्यांची कार्ये अंधारात करतात आणि असा विचार करतात, “आम्हाला कोण पाहतो? हे कोणाला माहीत होईल?”