मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जा, या कारभाऱ्याला सांग, राजवाड्याचा प्रशासक शेबनाला सांग:

  2. “हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत आणि आता तुला झुगारून फेकणार आहेत.

  3. मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन आणि या अधिकाराच्या स्थानावरून ढकलून देईन.

  4. “मग मी माझा सेवक, हिल्कियाहचा पुत्र एल्याकीमला पाचारण करेन.

  5. तुझा पोशाख, तुझी पदवी, तुझा अधिकार मी त्याला देईन. तो यहूदीयाच्या लोकांचा व यरुशलेममधील रहिवाशांचा पिता होईल.

  6. मी त्याच्या खांद्यावर दावीदाच्या घराण्याची चावी ठेवेन. तो जे उघडेल, ते कोणीही बंद करू शकणार नाही आणि तो जे काही बंद करेल, ते कधीही उघडू शकणार नाही.

  7. मी त्याला एखाद्या खुंटीसारखे मजबूत ठिकाणी रोवेन; त्याच्या पित्याच्या घराण्यासाठी सन्मानाचे आसन होईल.

  8. सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी मजबूतपणे ठोकलेली पाचर डळमळीत होईल; ती उचकटून जाईल व निखळून जमिनीवर पडेल, तिच्यावर आधारलेले सर्व ओझे खाली पडेल.” ही याहवेहची वाणी आहे.

  9. सर्वसमर्थ याहवेहनी ती योजना केली आहे, तिच्या सर्व वैभवाचा गर्व कमी करण्यासाठी आणि पृथ्वीवर नामांकित असलेल्या सर्वांना नम्र करण्यासाठी.

  10. याहवेहनी त्यांचा हात समुद्रापलीकडे लांबविला आहे, आणि तिच्या राज्यांना थरकाप आणला आहे. त्यांनी कनानच्या संदर्भात आदेश दिले आहेत की, तिचे किल्ले नष्ट केले जावे.

  11. ते म्हणाले, “कुमारिके सीदोन, यापुढे तुझी चैनबाजी चालणार नाही. आता तू चिरडली जावी! “वर कित्तीम पलीकडे गेलात; तर तिथेही तुम्हाला विश्रांती मिळणार नाही.”

  12. खास्द्यांच्या भूमीकडे बघा या लोकांचे आता काहीही महत्त्व राहिले नाही! अश्शूर लोकांनी ते वाळवंटातील श्वापदांसाठी एक ठिकाण केले आहे; त्यांनी त्यांचे वेढा बुरूज उभारले, त्यांनी त्याचे मोठे किल्ले पाडले आणि त्याचे भग्नावशेष केले.

  13. सत्तर वर्षांच्या शेवटी, याहवेह सोरबरोबर व्यवहार करतील. ती तिच्या फायदेशीर वेश्याव्यवसायाकडे परत येईल आणि पृथ्वीतलावरील सर्व राज्यांबरोबर तिचा व्यापार करेल.

  14. तरीसुद्धा तिचा नफा आणि तिचे उत्पन्न याहवेहसाठी वेगळे ठेवले जाईल; ते साठविले जाणार नाही किंवा त्याचा गुप्तसंचय केला जाणार नाही. तिचा फायदा याहवेहसमोर जे राहतात त्यांना भरपूर अन्न आणि उत्तम कपडे मिळावे यासाठी त्यांच्याकडे जाईल.

  15. पाहा, याहवेह पृथ्वीचा नाश करणार आहेत आणि ती उद्ध्वस्त करणार आहेत; ते तिचा चेहरा बिघडवून टाकतील आणि तेथील रहिवाशांची पांगापांग करतील—

  16. पृथ्वी पूर्णपणे पडीक जमीन होईल आणि संपूर्णपणे लुटली जाईल. हे शब्द याहवेह बोलले आहेत.

  17. ते हर्षाने आरोळ्या मारतील; आनंदाने गजर करतील, पश्चिमेकडून ते याहवेहच्या ऐश्वर्याची स्तुती करतील.

  18. म्हणून पूर्वेकडे याहवेहचा गौरव करा; समुद्राच्या बेटांवर, इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या नावाचा गौरव करा.

  19. त्या दिवशी याहवेह, वर आकाशातील अधिपतींना आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील.

  20. चंद्राची त्रेधा उडेल, सूर्य लज्जित होईल; कारण सर्वसमर्थ याहवेह वैभवाने सीयोन पर्वतावर आणि यरुशलेममध्ये, आणि आपल्या वडीलजनांसमोर—गौरवाने राज्य करतील.

  21. याहवेह तुम्ही माझे परमेश्वर आहात; मी तुम्हाला उंचावेन आणि तुमच्या नावाची स्तुती करेन, कारण परिपूर्ण विश्वासूपणाने तुम्ही अद्भुत गोष्टी केल्या आहेत, ज्या फार पूर्वीपासून योजलेल्या होत्या.

  22. तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले, तटबंदी असलेले नगर उद्ध्वस्त केले, परकियांचे किल्ले आता नगर म्हणून अस्तित्वात नाहीत. ते परत कधीही बांधले जाणार नाही.

  23. म्हणून बलवान लोक तुमचा सन्मान करतील; निर्दयी राष्ट्रांची नगरे तुमचा आदर करतील.

  24. तुम्ही गरिबांसाठी आश्रयस्थान असे आहात, गरजवंतासाठी त्यांच्या संकटातील आश्रयस्थान आहात, वादळामध्ये निवारा आहात आणि उष्णतेमध्ये सावली आहात. कारण निर्दयी लोकांचा श्वास हा भिंतीवर चालून येणाऱ्या वादळासारखा आहे,

  25. या डोंगरावर सर्वशक्तिमान याहवेह सर्व लोकांसाठी उत्तम अन्नाच्या मेजवानीची तयारी करतील, जुन्या द्राक्षारसाची मेजवानी— सर्वोत्तम मांस आणि सर्वोत्कृष्ट द्राक्षारस.