God
God चा उल्लेख असलेली वचने
कारण याहवेहने दुष्टांची काठी, व तुझा दुष्टाईचा राजदंड मोडला आहे,
तू तुझ्या अंतःकरणात म्हणाला, “मी स्वर्गात चढून जाईन; मी माझे सिंहासन परमेश्वराच्या ताऱ्यांपेक्षा उंच करेन; मी लोकसभेच्या पर्वतावरील सिंहासनावर बसेन, झाफोनच्या सर्वात उंच पर्वतावर मी स्थानापन्न होईन.
मी ढगांच्या शिखरांवर जाईन; मी स्वतःला सर्वोच्च परमेश्वरासारखे करेन.”
सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “मी त्यांच्याविरुद्ध उठेन, बाबेलचे नाव आणि तेथील जिवंत राहिलेले, तिची संतती आणि तिच्या वंशजांना मी नामशेष करून टाकेन,” असे याहवेह घोषित करतात.
“मी तिला घुबडांचे निवासस्थान आणि दलदलीचा प्रदेश करेन; मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकेन,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.
सर्वसमर्थ याहवेहनी शपथ घेतली आहे, “निश्चितच, मी जी योजना केली आहे, तसेच होईल, आणि जो माझा संकल्प आहे, त्याप्रमाणे हे घडून येईल.
माझ्या भूमीवर मी अश्शूरांना चिरडून टाकेन; त्यांना माझ्या डोंगरावर तुडवेन. त्याचे जू माझ्या लोकांवरून काढून टाकेन, आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून उतरवेन.”
सर्वसमर्थ याहवेहचा हा संकल्प आहे, तो कोण निष्फळ करू शकतो? त्यांचा हात उठला आहे, त्याला कोण आवर घालू शकतो?
आता राष्ट्रांच्या राजदूतांना काय उत्तर देण्यात यावे? “याहवेहने सीयोन स्थापिले आहे, आणि त्यांच्या पीडितांना तिच्यात आश्रय मिळेल.”
दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे, परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन— मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवर आणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन.
पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या; संहारकापासून त्यांचा आश्रय व्हा.” जुलूम करणाऱ्याचा शेवट होईल, आणि नाश थांबेल; आक्रमण करणारे नाहीसे होतील.
प्रीतीने सिंहासन स्थापित केले जाईल; दावीदाच्या घराण्यातील एकजण, विश्वासूपणाने त्यावर बसेल— जो न्यायनिवाडा करताना न्यायाची बाजू घेतो आणि धार्मिकतेची कामे जलदगतीने करतो.
म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.
फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे; द्राक्षमळ्यात कोणीही गाणे गात नाही किंवा हर्षनाद करत नाही; कोणीही द्राक्षकुंडातून द्राक्षारस काढीत नाही, कारण मी हर्षनाद करणे संपवून टाकले आहे.
याहवेह यांनी मोआबविरुद्ध आधीच हे वचन सांगितले आहे.
परंतु आता याहवेह असे म्हणतात: “तीन वर्षात, कराराने बांधलेला सेवक त्यांची मोजणी करेल, मोआबचे वैभव आणि तिच्या सर्व लोकांचा तिरस्कार केला जाईल आणि तिचे अवशिष्ट लोक फारच कमी आणि दुर्बल असतील.”
तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.
जसे जैतुनाच्या झाडाला झोडपतात तेव्हा उंचटोकाच्या फांद्यांवर दोन किंवा तीन जैतून, आणि फळ देणाऱ्या मोठ्या फांद्यांवर चार किंवा पाच जैतून राहून जातात, तसे जमा करण्याचे काही शिल्लक राहील,” असे इस्राएलचे परमेश्वर याहवेह घोषित करतात.
त्या दिवशी लोक त्यांच्या निर्माणकर्त्याकडे पाहतील त्यांची दृष्टी इस्राएलच्या पवित्र परमेश्वराकडे वळवतील.
तुम्ही तुमचे तारणकर्ते परमेश्वरांना विसरले आहात; तुम्ही तुमचा दुर्ग, तुमच्या खडकाची आठवण केली नाही. जरी तुम्ही अत्युत्तम झाडांची लागवड केली आहे, आणि विदेशी द्राक्षवेलींची लागवड केली आहे,
जरी लोक उचंबळणाऱ्या पाण्याप्रमाणे गर्जना करतात, जेव्हा याहवेह त्यांना दटावतात, तेव्हा ते दूर पळून जातात, टेकड्यांवरील भुश्याप्रमाणे वार्याने पुढे ढकलून दिले जातात, जणू काही वावटळीची धूळ वादळी वाऱ्यासमोर जाते.
याहवेह मला असे म्हणतात: “मी शांत राहीन आणि माझ्या निवासस्थानातून पाहीन, सूर्यप्रकाशामध्ये चमकणाऱ्या उष्णतेसारखे, दव असलेले ढग कापणीच्या उन्हात असल्यासारखे.”
कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.
त्याकाळी सर्वसमर्थ याहवेहसाठी सीयोनातून भेटी आणल्या जातील धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडून, ज्यांचे भय आहे अशा दूरवरच्या लोकांकडून, विक्षिप्त भाषण करणाऱ्या आक्रमक राष्ट्राकडून, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे. अशा लोकांकडून सर्वसमर्थ याहवेह यांच्यासाठी भेटी आणल्या जातील.
इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी: पाहा, याहवेह वेगवान ढगावर स्वार होऊन इजिप्तला येत आहेत. इजिप्तच्या मूर्ती त्यांच्यापुढे थरथर कापतात, आणि इजिप्तच्या लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून जातात.