मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत, आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचा शोधही घेतला नाही.

  2. म्हणून याहवेह एकाच दिवसात इस्राएलचे मस्तक आणि शेपूट, खजूराच्या फांद्या आणि लव्हाळा हे दोन्ही कापून टाकतील;

  3. म्हणूनच प्रभू त्यांच्या तरुण पुरुषांना पाहून प्रसन्न होणार नाहीत; त्यांना विधवांचा आणि अनाथांचा कळवळा येणार नाही; कारण हे सर्वच अधर्मी व दुष्ट असून, प्रत्येक मुख असत्य बोलणारे आहे. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  4. सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने भूमी होरपळून जाईल आणि लोक त्या आगीचे इंधन होतील; ते एकमेकांना वाचविणार नाहीत.

  5. मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल; ते एकत्र मिळून यहूदीयाच्या विरोधात जातील. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  6. गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी.

  7. बंदिवानांमध्‍ये लपून बसणे, किंवा मेलेल्यांमध्ये पडून राहाणे या वाचून काहीही उरणार नाही. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  8. “अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!

  9. मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.

  10. शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ”

  11. जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.

  12. म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, त्याच्या दणकट योद्ध्यांवर विनाशकारी रोग पाठवतील; त्यांच्या ऐश्वर्यात धगधगत्या ज्योतीसारखा अग्नी प्रज्वलित केला जाईल अग्नी प्रज्वलित केला जाईल.

  13. इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल, त्यांचे पवित्र परमेश्वर एक ज्वाला होतील; त्याचे काटे आणि काटेरी झुडपे ते एकाच दिवसात जळतील व भस्म करतील.

  14. त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट, जिवंत राहिलेले याकोबाचे लोक, ज्याने त्यांना मारून टाकले त्याच्यावर यापुढे अवलंबून राहणार नाहीत, परंतु याहवेह, इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर ते खरोखरच भरवसा ठेवतील.

  15. याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल, सर्वसमर्थ परमेश्वराकडे परत येईल.

  16. हे, इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या वाळूच्या कणासारखे असली तरी, उरलेलेच मात्र परत येतील. नाश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, परिपूर्ण आणि न्याययुक्त.

  17. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, नाश करण्याचा हुकूमनामा संपूर्ण देशामध्ये अंमलात आणतील.

  18. म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “माझे लोकहो, जे तुम्ही सीयोनमध्ये राहता, अश्शूरी लोकांना घाबरू नका, जे तुम्हाला दांडक्याने मारतात. आणि इजिप्तने केले त्याप्रमाणे तुमच्याविरुद्ध सोटा उगारतात.

  19. तुमच्याविरुद्ध असलेला माझा राग लवकरच संपेल आणि माझा क्रोध त्यांच्या नाशाच्या मार्गाकडे वळेल.”

  20. सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील, जसे त्यांनी मिद्यानाला ओरेबच्या खडकावर मारले होते; आणि ते त्यांची काठी पाण्यावर उंच करतील, जसे त्यांनी इजिप्तमध्ये केले होते.

  21. हे पाहा, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, मोठ्या सामर्थ्याने झाडांच्या मोठ्या फांद्या छाटून टाकतील. भव्य झाडे पाडली जातील, उंच झाडे खाली आणली जातील.

  22. ते कुऱ्हाडीने जंगलातील झाडेझुडपांचे रान कापून टाकतील; लबानोन प्रतापी परमेश्वरासमोर पडेल.

  23. याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल— शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—

  24. आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील. ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत, किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.

  25. परंतु ते नीतिमत्त्वाने गरजवंत लोकांचा न्याय करतील, न्यायाने ते पृथ्वीवरील गरिबांसाठी निर्णय देतील. ते त्यांच्या मुखाच्या काठीने पृथ्वीवर हल्ला करतील; ते त्यांच्या ओठांच्या श्वासाने दुष्टांचा वध करतील.