मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.

  2. जेव्हापर्यंत त्याला योग्य व अयोग्याची पारख करता येत नाही, तेव्हापर्यंत तो दही आणि मध खाईल,

  3. एफ्राईम आणि यहूदीया विभक्त झाले त्या वेळेपासून अशी वेळ आली नव्हती, तशी वेळ याहवेह तुमच्यावर आणि तुमच्या लोकांवर आणि तुमच्या पित्याच्या घराण्यावर आणतील—ते अश्शूरच्या राजाला आणतील.”

  4. त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील.

  5. त्या दिवशी प्रभू फरात नदीच्या पलीकडून भाड्याने आणलेला वस्तरा—अश्शूरचा राजा—याचा उपयोग तुमची डोकी आणि गुप्तांगाचे मुंडण करण्यासाठी आणि तुमच्या दाढ्या कापण्यासाठीही करतील.

  6. याहवेह मला म्हणाले, “एक मोठी चर्मपत्राची पाटी घे आणि त्याच्यावर एका साध्या लेखणीने लिही: महेर-शालाल-हश-बाज.”

  7. तेव्हा मी माझी पत्नी, जी संदेष्टी आहे, तिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि ती गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. आणि याहवेह मला म्हणाले, “त्याचे नाव महेर-शालाल-हश-बाज असे ठेव.

  8. याहवेह पुन्हा माझ्याबरोबर असे बोलले:

  9. म्हणून प्रभू आता त्यांच्यावर फरात नदीचे महाप्रलय आणणार आहे— अश्शूरचा राजा त्याच्या सर्व वैभवात हे आणणार आहे. ते त्याच्या सर्व खाडींवरून भरून वाहील, त्याच्या सर्व किनाऱ्यांवरून वाहील,

  10. तुमची रणनीती तयार करा, परंतु ती उलथवून टाकली जाईल; तुमची योजना सुचवा, परंतु ती चालणार नाही, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहेत.

  11. याहवेहचा शक्तिशाली हात माझ्यावर ठेवून मला असे म्हणतात, या लोकांच्या मार्गाचे अनुसरण करू नकोस:

  12. याहवेह जे सर्वसमर्थ आहेत, त्यांना तुम्ही पवित्र मानावे, तेच आहेत ज्यांचे तुम्ही भय धरावे, तेच आहेत ज्यांना तुम्ही घाबरावे.

  13. इस्राएल आणि यहूदीया या दोघांसाठी; ते एक पवित्रस्थान असतील, लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक, ज्यामुळे ते पडतील. आणि यरुशलेमच्या लोकांसाठी तो एक सापळा आणि पाश होईल.

  14. चेतावणीच्या या साक्षीला बांधून घ्या आणि परमेश्वराची ही शिकवण माझ्या शिष्यांमध्ये मोहोरबंद करा.

  15. मी याहवेहची वाट पाहीन जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन.

  16. मी आणि याहवेहने मला दिलेली लेकरेही येथे आहेत. आम्ही, सीयोन पर्वतावर राहणारे सर्वसमर्थ याहवेहकडून इस्राएलला मिळालेले चिन्ह व प्रतीक आहोत.

  17. जेव्हा कोणी तुम्हाला प्रेतात्म्यांकडून अर्थ सांगणाऱ्यांचा सल्ला आणि भूतविद्येचा सल्ला घेण्यास सांगतात, जे कुजबुजतात आणि पुटपुटतात, त्यांच्याकडे लोकांनी त्यांच्या परमेश्वराबद्दल विचारणा करावी काय? जिवंत लोकांसाठी मृतांचा सल्ला का घ्यावा?

  18. दुःखी आणि भुकेले असे ते देशभर फिरत राहतील; जेव्हा ते भुकेने व्याकूळ होतील, तेव्हा ते रागावतील आणि वर पाहतील आणि त्यांच्या राजाला आणि त्यांच्या परमेश्वराला शाप देतील.

  19. तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—

  20. तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे आणि त्यांचा आनंद वाढविला आहे. जसे लोक कापणीच्या वेळेस आनंद करतात, तसे ते तुमच्यासमोर आनंद करतात, लुटलेला माल वाटून घेतांना युद्ध करणारे आनंद करतात तसे.

  21. कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.

  22. त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा अंत होणार नाही. ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत न्याय आणि धार्मिकता स्थापन करतील आणि टिकवतील. सर्वसमर्थ याहवेहचा आवेश हे पूर्ण करेल.

  23. प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे; तो इस्राएलवर पडेल.

  24. परंतु याहवेहनी रसीनच्या शत्रूंना त्यांच्याविरुद्ध बळकट केले आहे आणि त्यांच्या शत्रूंना प्रेरित केले आहे.

  25. पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी इस्राएलला मोठा आ वासून गिळंकृत केले आहे. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.