मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?

  2. आता मी तुम्हाला सांगेन, मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे: मी त्याचे कुंपण काढून टाकेन, आणि त्याचा नाश होईल; मी त्याची भिंत पाडेन, आणि ते तुडविले जाईल.

  3. मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”

  4. इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.

  5. माझ्या ऐकण्यात आले, सर्वसमर्थ याहवेहनी असे जाहीर केले आहे: “मोठमोठी घरे निश्चितच निर्जन होतील, उत्तम महालांमध्ये कोणी रहिवासी नसेल.

  6. त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.

  7. म्हणून असमजंसपणामुळे माझे लोक बंदिवासात नेले जातील; उच्च पदावरील लोक भुकेने मरतील आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील.

  8. परंतु सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या न्यायाद्वारे उच्च केले जातील, आणि पवित्र परमेश्वर त्यांच्या नीतिमान कृत्यांद्वारे पवित्र ठरतील.

  9. धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या; त्यांना त्यांचे काम लवकर करू द्या म्हणजे आपल्याला ते पाहता येईल. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराची योजना— ती जवळ येऊ द्या, ती दृष्टीस पडू द्या, म्हणजे आम्हाला ती कळेल.”

  10. म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते, तशीच त्यांची मुळे कुजून जातील, आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील; कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे.

  11. म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे; त्यांनी हात उगारला आहे आणि ते त्यांना मारून टाकतात. पर्वत डगमगतात, आणि मृतदेह रस्त्यांवर कचऱ्यासारखे पडलेले आहेत. हे सर्व करूनही, त्यांचा क्रोधाग्नी अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.

  12. दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!

  13. उज्जीयाह राजा मरण पावला त्या वर्षी, मी प्रभूला सिंहासनावर बसलेले उच्चतम आणि गौरवी असे पाहिले; आणि त्यांच्या अंगरख्याच्या घोळाने मंदिर भरून गेले होते.

  14. आणि ते एकमेकांना म्हणत होते: “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत; त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!”

  15. “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”

  16. नंतर मी प्रभूची वाणी ऐकली, “मी कोणाला पाठवावे? आणि आपल्यासाठी कोण जाईल?” मी उत्तर दिले, “हा मी इथे आहे, मला पाठवा!”

  17. ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग: “ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही, ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’

  18. नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?” आणि त्यांनी उत्तर दिले: “शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत, घरे ओसाड पडत नाहीत आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत.

  19. याहवेह सर्व लोकांना दूर पाठवून देईपर्यंत आणि देशाचा पूर्णपणे त्याग केला जाईपर्यंत.

  20. तेव्हा याहवेह यशायाहला म्हणाले, “तू आणि तुझा पुत्र शेर-याशूब यांनी बाहेर पडावे आणि आहाजची भेट घेण्यासाठी धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहून नेणाऱ्या वरच्या पुलाच्या शेवटी जावे.

  21. तरीही सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘तसे होणार नाही, तसे घडणार नाही,

  22. पुन्हा याहवेह आहाजबरोबर बोलले,

  23. “याहवेह तुमच्या परमेश्वराकडे चिन्ह मागा, मग ते अधिक खोल तळातील असो किंवा ते सर्वोच्च उंचावरील असो.”

  24. परंतु आहाज म्हणाला, “मी विचारणार नाही; मी याहवेहची परीक्षा घेणार नाही.”

  25. तेव्हा यशायाह म्हणाला, “अहो तुम्ही दावीदाच्या घराण्यांनो, आता ऐका! माणसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणे पुरेसे झाले नाही का? तुम्ही माझ्या परमेश्वराच्यासुद्धा सहनशक्तीची परीक्षा घेणार आहात का?