मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जा, आनंदाने तुझे भोजन कर, आणि हर्षित हृदयाने आपला द्राक्षारस पी, कारण तू जे करतो ते परमेश्वराने आधी मान्य केले आहे.

  2. सूर्याखाली परमेश्वराने तुला देऊ केलेल्या अर्थहीन जीवनाच्या आपल्या सर्व दिवसांत आपली पत्नी, जिच्यावर तू प्रेम करतो, तिच्याबरोबर या निरर्थक जीवनाचा आनंद उपभोग. कारण सूर्याखाली तुझ्या जीवनाचा व श्रमाचा हाच वाटा आहे.

  3. जसे वार्‍याचे मार्ग, किंवा आईच्या उदरात गर्भ कसा वाढतो हे तुला कळत नाही, तसेच परमेश्वर जे सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, त्यांची कृत्येही तुला समजू शकत नाहीत.

  4. जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा, तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला आनंद देवो. तुझे हृदय जे काही इच्छिते आणि तुझे नेत्र जे काही पाहतात त्याप्रमाणे कर, परंतु हे लक्षात असू दे की परमेश्वर या सर्वांनुसार तुझा न्याय करेल.

  5. आणि माती जिथून आली तिथे जाण्याआधी, आणि परमेश्वराने दिलेला आत्मा त्याकडे परतण्याआधी आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर.

  6. आता सर्व ऐकून झाले; सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की: परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ, कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे.

  7. कारण प्रत्येक गुप्त गोष्टीबद्दल, ती चांगली असो किंवा वाईट, त्याचा परमेश्वर न्याय करतील.

  8. हे आकाशा, माझे ऐक! हे पृथ्वी ऐक! कारण याहवेह असे म्हणाले: “मी मुलांचे संगोपन केले आणि त्यांना वाढविले, परंतु त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे.

  9. बैल त्याच्या मालकाला ओळखतो, गाढव त्याच्या मालकाचा गोठा ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, माझ्या लोकांना समजत नाही.”

  10. हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो, तुम्ही लोक, ज्यांचा अपराध फार मोठा आहे, वाईट कृत्ये करणाऱ्यांची पिल्ले, भ्रष्टाचारासाठी देऊन टाकलेली मुले! त्यांनी याहवेहना सोडून दिले आहे; इस्राएलच्या पवित्राला तिरस्काराने झिडकारले आहे, आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे.

  11. सर्वसमर्थ याहवेह यांनी जर आमच्यातील काहींना वाचविले नसते तर, आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोरासारखी आमची गत झाली असती.

  12. अहो, सदोमाचे राज्यकर्ते, याहवेहचे शब्द ऐका; तुम्ही गमोराचे लोकहो, आमच्या परमेश्वराची सूचना ऐका!

  13. “तुमची असंख्य होमर्पणे— ती माझ्यासाठी काय आहेत?” असे याहवेह म्हणतात. “होमार्पणासाठी माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त मेंढे आणि पुष्ट वासरे यांची चरबी आहे; बैलांच्या, मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या रक्तामध्ये मला काही आनंद नाही.

  14. जेव्हा तुम्ही माझ्यासमोर येता, तुम्हाला कोणी सांगितले, की माझ्या मंदिरांचे अंगण तुडवा?

  15. अर्थशून्य अर्पणे आणणे बंद करा! तुमच्या सुगंधी धूपाचा मला तिटकारा वाटतो. नवचंद्र उत्सव, शब्बाथ आणि समारंभ— अशा तुमच्या निरर्थक सभा मी सहन करू शकत नाही.

  16. तुमचे अमावस्याचे उत्सव आणि तुमचे नेमलेले सण यांचा मी माझ्या संपूर्णतेने तिरस्कार करतो. ते मला भार असे झाले आहेत; त्यांना सहन करता मी थकून गेलो आहे.

  17. प्रार्थनेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे हात पसरता, तेव्हा मी तुमच्यापासून माझे डोळे लपवितो; जेव्हा तुम्ही पुष्कळ विनवण्या करता, मी त्या ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत!

  18. “या आता, आपण वाद मिटवू या,” असे याहवेह म्हणतात. “जरी तुमची पापे लाखेसारखी असली, तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; जरी ती किरमिजाप्रमाणे लाल असली, तरी ती लोकरीसारखी होतील.

  19. परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत.

  20. म्हणून प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे महाशक्तिमान असे जाहीर करतात: “अहा! मी माझ्या शत्रूंवर माझा क्रोध मोकळा करेन आणि माझ्या शत्रूंचा मी स्वतः सूड घेईन.

  21. मी माझा हात तुमच्याविरुद्ध उचलेन; मी तुमची सर्व मलिनता पूर्णपणे काढून टाकेन आणि तुमची सर्व अशुद्धता काढून दोषरहित करेन.

  22. मी तुमच्या पुढाऱ्यांना परत पूर्वस्थितीत आणेन, तुमचे राज्यकर्त्ये सुरुवातीला होते तसेच त्यांना परत करेन. त्यानंतर तुम्हाला, धार्मिकतेचे शहर, विश्वासू शहर असे म्हटले जाईल.”

  23. परंतु बंडखोर आणि पापी या दोघांना मोडण्यात येईल, आणि ज्यांनी याहवेहचा त्याग केला, त्यांचा नाश होईल.

  24. पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जाईल; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जाईल, आणि सर्व राष्ट्रे त्याकडे एकत्र येतील.

  25. अनेक लोक येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.