मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जर तुम्ही असे म्हणाल, “यासंबंधी आम्हाला काहीही माहीत नव्हते,” तर त्यांच्या लक्षात येणार नाही का जे सर्वांची अंतःकरणे तोलून पाहतात? जे तुझ्या जीवनाची रक्षा करतात त्यांना हे माहीत नाही का? ते प्रत्येक मनुष्याला त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देणार नाहीत का?

  2. नाहीतर याहवेह ते पाहतील आणि अमान्य करतील आणि त्यांच्या क्रोधापासून त्यांना दूर करतील.

  3. माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर आणि बंडखोर अधिकार्‍यांना सहभागी होऊ नकोस,

  4. रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे; आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे.

  5. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील.

  6. जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्‍या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्‍या धनुर्धारीसारखा आहे.

  7. योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही, परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते.

  8. लोभी मनुष्य भांडणे लावतो, परंतु जे याहवेहवर भरवसा ठेवतात त्यांची भरभराट होईल.

  9. गरीब मनुष्य व जुलमी मनुष्य यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे: ती म्हणजे याहवेह दोघांना दृष्टी प्रदान करतात.

  10. मनुष्याचे भय धोकादायक सापळा असतो, परंतु जो याहवेहवर विश्वास ठेवतो त्याला सुरक्षित ठेवण्यात येते.

  11. पुष्कळ लोक राजाची भेट घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु योग्य न्याय याहवेहकडूनच मिळतो.

  12. मी सुज्ञता शिकलो नाही, तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही.

  13. वर स्वर्गात कोण चढून गेला आणि मग खाली उतरला आहे? वार्‍याला मुठीमध्ये धरलेला असा कोण आहे? अंगरख्यामध्ये कोणी पाणी बांधले आहे काय? पृथ्वीच्या सर्व सीमांची स्थापना कोणी केली आहे? त्याचे नाव काय आहे आणि त्याच्या पुत्राचे नाव काय आहे? तुम्हाला ते निश्चितच माहीत आहे!

  14. “परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे; जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.

  15. त्यांच्या वचनात भर घालू नका. नाहीतर ते तुम्हाला रागावतील आणि तुम्ही लबाड आहात हे सिद्ध होईल.

  16. “हे याहवेह, मी दोन कृपादानांची याचना करतो; माझ्या मरणापूर्वी मला नकार देऊ नका:

  17. कारण असे होऊ नये, कि मी श्रीमंत झालो तर तुम्हाला विसरेन आणि म्हणेन, ‘याहवेह कोण आहे?’ किंवा दरिद्री झालो तर कदाचित मी चोरी करेन आणि माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल.”

  18. मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.

  19. आकाशाखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आणि शोध सुज्ञानाने करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्यावर किती जड ओझे लादले आहे!

  20. खाणे आणि पिणे करून स्वतःच्या कष्टामधून समाधान मिळविणे यापेक्षा मानव अधिक चांगले काय करू शकतो आणि मी पाहतो की, हे सुद्धा परमेश्वराच्याच हातात आहे,

  21. जो व्यक्ती परमेश्वराला संतुष्ट करतो, त्याला परमेश्वर ज्ञान, बुद्धी आणि आनंद देतात, परंतु पाप्यांना संपत्ती गोळा करून ती जो व्यक्ती परमेश्वराला प्रसन्न करतो त्याच्या हाती सोपविण्याचे कार्य दिले आहे. हे सुद्धा वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे व्यर्थ आहे.

  22. परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे.

  23. त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्याच्या समयात सुंदर अशी बनविली आहे. परमेश्वराने मनुष्याच्या अंतःकरणात अनंतकाळचे जीवन ठेवलेले आहे. तरीसुद्धा परमेश्वराने आरंभापासून शेवटपर्यंत केलेली कृत्ये कोणीही समजू शकले नाहीत.

  24. प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या कष्टाच्या कार्यात संतुष्ट राहावे—हे परमेश्वराने दिलेले दान आहे.

  25. मला हे माहीत आहे की परमेश्वराने जे केले ते सर्वकाळ टिकणारे आहे; त्यात काही भर घालता येणार नाही किंवा त्यातून काही काढून घेता येणार नाही. मनुष्याने त्यांचे भय धरावे म्हणून परमेश्वर हे सर्व करतात.