God
God चा उल्लेख असलेली वचने
ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.
मनुष्य स्वतःच्याच मूर्खपणाने आपल्या नाशाकडे जातो, तरीही त्याचे हृदय याहवेहविरुद्ध संतापते.
पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते, परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.
जो गरिबांना मदत करतो, तो याहवेहला उसने देतो, आणि त्यांच्या सत्कृत्याबद्दल याहवेह परतफेड करतील.
मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, पण याहवेहची योजनाच यशस्वी होते.
याहवेहच्या भयाने जीवनप्राप्ती होते; तेव्हा अरिष्टाचा स्पर्शही न होता, एखादा समाधानाने विश्रांती घेतो.
वजनावजनांत व मापामापांत फरक असणे— या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे.
पाहणारे डोळे व ऐकणारे कान— दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे.
“वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील.
वजनात व मापात फरक असणे याचा याहवेहला वीट आहे आणि अप्रामाणिक वजनकाटे त्यांना प्रसन्न करीत नाहीत.
याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात. तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?
मनुष्याचा आत्मा याहवेहचा दीप आहे. तो मनुष्याच्या अंतःकरणावर प्रकाश टाकतो.
याहवेहच्या नियंत्रणात असलेले राजाचे हृदय पाण्याचा प्रवाह आहे, जे त्यांना संतोष देतात त्यांच्याकडे ते वळवितात.
माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत, परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात.
अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.
नीतिमान व्यक्ती दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतात आणि त्या दुष्टाची दुष्टता त्याचा नाश करतात.
मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.
लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.
श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे.
याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
याहवेहचे नेत्र ज्ञानाचे रक्षण करतात, परंतु विश्वासघातकी मनुष्याचे शब्द ते निरर्थक करतात.
वेश्येचे मुख खोल खड्डा आहे; ज्यांच्यावर याहवेहचा क्रोध आहे तेच त्या खड्ड्यात पडतात.
म्हणजे तुझा याहवेहवर विश्वास राहील, मी आज तुला शिकवितो, होय तुलासुद्धा.
कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील.
तुझ्या अंतःकरणात दुष्टांचा हेवा करू नकोस, परंतु याहवेहचे भय बाळगण्यास सदैव आवेशी राहा.