मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते, परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात.

  2. याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो, परंतु नीतिमानाचे घर ते आशीर्वादित करतात.

  3. उपहास करणार्‍या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात.

  4. कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत, आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.

  5. याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:

  6. याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.

  7. याहवेहनी त्यांच्या सृष्टी निर्मितीमध्ये, त्यांच्या पुरातन कार्यापूर्वी सर्वप्रथम माझी रचना केली;

  8. त्यांनी पृथ्वी किंवा तिच्यावरील शेती किंवा पृथ्वीवरील धूळ निर्माण करण्यापूर्वी,

  9. त्यांनी जेव्हा आकाशास त्याच्या ठिकाणी स्थापित केले, जेव्हा त्यांनी महासागरावर क्षितिजाची सीमा निश्चित केली तेव्हा मी तिथे होते,

  10. जेव्हा त्यांनी वर अंतराळात ढगांची प्रस्थापना केली आणि पृथ्वीगर्भातील झर्‍यांना घट्ट बसविले,

  11. जेव्हा त्यांनी सागरांना त्यांच्या मर्यादा घालून दिल्या, जेणेकरून पाणी त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही. जेव्हा त्यांनी पृथ्वीचा पाया घातला,

  12. तेव्हा मी सतत त्यांच्याभोवती होते; दिवसेंदिवस मी आनंदाने भरून गेले होते. नेहमी त्यांच्या उपस्थितीचा आनंद मी घेत होते,

  13. त्यांच्या संपूर्ण जगामध्ये मी आनंदात आहे आणि मानवजातीमध्ये आनंद करीत आहे.

  14. कारण ज्याला मी सापडते, त्याला जीवन सापडते, आणि त्याला याहवेहकडून कृपादृष्टी मिळते.

  15. याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय.

  16. याहवेह नीतिमान मनुष्याची उपासमार होऊ देत नाहीत, परंतु दुष्टांची लालसा ते विफल करतात.

  17. याहवेहच्या आशीर्वादाने धनसंपत्ती मिळते, त्यासाठी दुःखद परिश्रम करावे लागत नाहीत.

  18. याहवेहचे भय बाळगल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते, परंतु दुष्टांच्या आयुष्याची वर्षे कमी केली जातील.

  19. याहवेहचा मार्ग निर्दोष मनुष्याचे आश्रयस्थान आहे, परंतु जे दुष्कर्म करतात त्यांच्यासाठी तो नाश आहे.

  20. खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात, परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो.

  21. याहवेह विकृत अंतःकरणाच्या लोकांचा तिरस्कार करतात, परंतु निर्दोष मार्गाने चालणारे त्यांना प्रसन्न करतात.

  22. नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते, पण दुष्ट योजना रचणार्‍या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात.

  23. असत्य बोलणार्‍या ओठांची याहवेह घृणा करतात, परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात.

  24. जो कोणी याहवेहचे भय बाळगतो तो प्रामाणिकपणाने वागतो, परंतु जे त्यांचा तिरस्कार करतात त्यांचा मार्ग कपटी असतो.

  25. याहवेहचा आदर मनुष्याचा दृढ गड आहे, आणि त्याच्या मुलाबाळांना सुरक्षित आश्रयस्थान लाभते.