मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही; ते त्यांच्या आज्ञांबाबत अज्ञानी आहेत. याहवेहचे स्तवन करा.

  2. याहवेहचे स्तवन करा. आकाशमंडलातून त्यांचे स्तवन करा; ऊर्ध्वलोकी त्यांचे स्तवन करा.

  3. त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो; त्यांची सर्व स्वर्गीय सेना, त्यांचे स्तवन करो.

  4. सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा; सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा.

  5. हे सर्वोच्च आकाशांनो, आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा.

  6. त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.

  7. आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही.

  8. पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो,

  9. विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.

  10. तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा, कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो; त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे.

  11. त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे, ते त्यांच्या सर्व नीतिमान भक्तांना, त्यांच्या अंतःकरणासमीप, त्यांना अत्यंत प्रिय अशा इस्राएली लोकांना स्तवन पात्र केले आहे. याहवेहचे स्तवन करा.

  12. याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.

  13. हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.

  14. त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.

  15. कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात.

  16. त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून,

  17. त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा. हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे. याहवेहचे स्तवन करा.

  18. याहवेहचे स्तवन करा. त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा; त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;

  19. त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा; त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;

  20. कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा; सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;

  21. डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा; तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.

  22. खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा; झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.

  23. प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो. याहवेहचे स्तवन करा.

  24. याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात.

  25. मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा! तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन, तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन.