मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी, नश्वर मानव तो काय की त्याचा तुम्ही विचार करावा?

  2. हे याहवेह, स्वर्ग उघडून खाली या; पर्वतांना स्पर्श करा म्हणजे ते धुमसतील.

  3. विजांचे लोळ मोकळे सोडा आणि शत्रूंची दाणादाण उडवून द्या; आपल्या बाणांचा वर्षाव करून त्यांना उधळून टाका.

  4. स्वर्गातून आपला हात लांब करून मला मुक्त करा; जलप्रवाहाच्या तडाख्यापासून मला सोडवा, आणि परक्यांच्या सामर्थ्यापासून मला मुक्त करा.

  5. हे परमेश्वरा, मी तुमच्यासाठी एक नवे गीत गाईन; दशतंत्री वीणेवर मी तुमच्या स्तवनाचे संगीत बनवेन.

  6. राजांना विजय तुमच्यामुळेच प्राप्त होतो, आणि तुमचा सेवक दावीदाला सुरक्षा प्रदान करणारे तुम्हीच आहात. घातकी तलवारीपासून

  7. ज्या लोकांना असे आशीर्वाद लाभतात ते सुखी होत; ज्या लोकांचा परमेश्वर याहवेह आहे, ते लोक धन्य आहेत.

  8. एक स्तवनगीत. दावीदाची रचना. हे माझ्या परमेश्वरा, माझ्या राजा, मी तुमचे स्तवन करेन; तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.

  9. प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.

  10. याहवेह महान आहेत व परमस्तुत्य आहेत; त्यांची थोरवी अगाध आहे.

  11. तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्‍या पिढीस विदित करते; ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात.

  12. ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात— आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन.

  13. ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील— मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन.

  14. ते तुमचा विपुल चांगुलपणा साजरा करतील, आणि आनंदाने तुमच्या नीतिमत्वाचे गुणगान गातील.

  15. याहवेह करुणामय व कृपावान आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने ओतप्रोत भरलेले आहेत.

  16. याहवेह सर्वांशी भलेपणाने वागतात; त्यांची करुणा त्यांच्या सर्व निर्मितीवर स्थिर असते.

  17. याहवेह तुमची निर्मिती तुमची उपकारस्तुती करेल, आणि तुमचे संतजन तुम्हाला धन्य म्हणतील.

  18. ते तुमच्या साम्राज्याच्या भव्यतेचे वर्णन आणि तुमच्या सामर्थ्याची उद्घोषणा करतील.

  19. जेणेकरून तुम्ही केलेली अद्भुत कृत्ये आणि तुमच्या अप्रतिम राजवैभवाबद्दल सर्व मानवजातीस ज्ञान होईल.

  20. कारण तुमचे राज्य अनंतकाळचे राज्य आहे, तुमची सत्ता पिढ्यान् पिढ्या चालते. याहवेह आपल्या सर्व प्रतिज्ञांशी एकनिष्ठ आहेत, त्यांच्या सर्व कार्यात ते विश्वासू असतात.

  21. याहवेह सर्व पतन पावलेल्यांस उचलून घेतात व ओझ्याखाली वाकलेल्यास आधार देऊन उभे करतात.

  22. सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता.

  23. तुम्ही आपला हात उघडता आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता.

  24. याहवेहचे प्रत्येक मार्ग न्यायीपणाचे आहे आणि ते आपल्या सर्व कृत्यात विश्वासू आहेत.

  25. जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात.