मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा.

  2. या दुष्ट लोकांची अभिलाषा पूर्ण होऊ देऊ नका, याहवेह, त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नका. सेला

  3. मला माहीत आहे की याहवेह गरिबांना न्याय देतात, आणि गरजवंतांना खात्रीने साहाय्य करतात.

  4. निश्चितच नीतिमान लोक तुमची उपकारस्तुती करतील; आणि नीतिमान तुमच्या समक्षतेत राहतील.

  5. दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या, जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.

  6. तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो; माझे हात उभारणे सायंकाळच्या यज्ञाप्रमाणे होवो.

  7. हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा; माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा.

  8. परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे; तुम्हीच माझा आश्रय आहात—मला मृत्यूच्या हवाली करू नका.

  9. दावीदाची मासकीलज्यावेळी तो गुहेमध्ये होता. एक अभ्यर्थना मी अगदी काकुळतीला येऊन याहवेहला विनवणी करतो; मी उच्चस्वरात याहवेहला दयेची विनंती करतो.

  10. माझी तक्रार मी त्यांच्यापुढे ओतत आहे, आणि माझे कष्ट मी त्यांच्यासमोर प्रकट करत आहे.

  11. कारण माझा आत्मा निराशेने व्याकूळ झाला आहे, तुमच्यासमोर माझी नियती नेहमी स्पष्ट असते. माझ्या शत्रूंनी माझ्या मार्गात सापळे लावले आहेत.

  12. मी याहवेहचा धावा करतो; मी म्हटले, “तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात, जिवंतांच्या भूमीत तुम्हीच माझे विधिलिखित आहात.”

  13. मला बंदिवासातून मुक्त करा, म्हणजे मला तुमची उपकारस्तुती करता येईल; मग तुम्ही मला साहाय्य केले, म्हणून नीतिमान लोक माझ्याबरोबर आनंदोत्सव करतील.

  14. दावीदाचे एक स्तोत्र. हे याहवेह, माझी प्रार्थना ऐका, कृपा करून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या, तुमच्या विश्वासूपणा व नीतिमत्वास अनुसरून माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर द्या.

  15. आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका, कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही.

  16. मला पुरातन काळचे स्मरण होत आहे; तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो, आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे.

  17. मी माझे हात तुमच्यापुढे पसरतो; शुष्क भूमीसारखा माझा जीव तुमच्यासाठी तहानलेला आहे. सेला

  18. हे याहवेह, त्वरेने मला उत्तर द्या; माझा आत्मा दुर्बल झाला आहे. तुम्ही आपले मुख माझ्यापासून लपवू नका, नाहीतर मी अधोलोकात जाणार्‍यासारखा होईन.

  19. प्रातःकाळी तुमच्या वात्सल्याचा मला प्रेमसंदेश येऊ द्या, कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. माझे जीवन मी तुमच्या हातात सोपविले आहे, म्हणून मी कोणत्या मार्गाने चालावे ते मला दाखवा.

  20. याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा, कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे.

  21. तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो.

  22. हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा; तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा.

  23. माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा; माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा, कारण मी तुमचा सेवक आहे.

  24. दावीदाचे स्तोत्र. याहवेहचे, माझ्या आश्रय खडकाचे स्तवन असो, ते माझ्या बाहूंना युद्धाचे व माझ्या बोटांना लढाईचे प्रशिक्षण देतात.

  25. तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग, सुरक्षितेचा बुरूज आणि माझे मुक्तिदाता आहेत; तेच माझी ढाल, माझे आश्रयस्थान आहेत, ते माझ्या प्रजेला माझ्यासमोर नम्र करतात.