God
God चा उल्लेख असलेली वचने
ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील, कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.
याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात; गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.
मी संकटांनी वेढलेला असलो, तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता; माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता; तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.
याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे.
माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.
हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात.
तुम्ही माझ्यापुढे व मागे, माझ्या सभोवती असता; तुम्ही आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला आहे.
तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?
मी वर स्वर्गात गेलो, तरी तिथे तुम्ही आहात; अधोलोकात माझे अंथरूण केले, तर तिथेही तुम्ही आहातच.
तर तिथेही तुमचा हात मला धरून चालवील; तुमचा उजवा हात मला आधार देईल.
अंधकार देखील तुमच्यापुढे अंधकार नाही, कारण तुमच्यापुढे रात्र दिवसासारखीच प्रकाशमान आहे; कारण अंधकार हा तुम्हाला प्रकाशासमान आहे.
माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे; माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.
मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो.
गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना, जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता, जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती.
तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले; माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली.
हे परमेश्वरा, माझ्याबद्दलचे तुमचे विचार किती मौल्यवान आहेत! अबब, किती अगणित आहेत ते!
जर मी त्याची गणती केली, तर ती वाळूच्या कणापेक्षाही अधिक होईल— मी सकाळी जागा होतो, तेव्हाही मी तुमच्या समक्षतेत असतो.
हे परमेश्वरा, दुष्ट लोकांचा तुम्ही नायनाट केला तर किती बरे होईल! अहो रक्तपिपासू लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा!
ते तुमच्याविरुद्ध दुष्टपणाच्या गोष्टींची योजना करतात; तुमचे शत्रू तुमच्या नामाचा गैरवापर करतात.
याहवेह, तुमचा द्वेष करणार्यांचा मीही द्वेष करू नये काय आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्यांचा मी तिरस्कार करू नये काय?
हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा; माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा.
संगीत दिग्दर्शकाकरिता दावीदाची रचना. एक स्तोत्र. याहवेह, मला दुष्ट लोकांपासून सोडवा; हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा.
दुष्टांपासून माझे रक्षण करा, याहवेह; त्या हिंसक लोकांपासून मला सुरक्षित ठेवा, कारण मला पाडण्याचा ते कट करीत आहेत.
याहवेहला मी म्हणतो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.” याहवेह, माझ्या विनवणीकडे कान द्या.