God
God चा उल्लेख असलेली वचने
मी त्याच्या शत्रूंना लज्जारूपी पांघरूण घालेन, परंतु त्याचे मस्तक राजमुकुटाने गौरवमंडित होईल.”
हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.
प्रवाशांचे आराधना गीत. अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता.
पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा.
स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.
याहवेहचे स्तवन करा. याहवेहच्या नामाचे स्तवन करा; तुम्ही, जे याहवेहचे सेवक आहात, ते सर्व याहवेहचे स्तवन करोत.
व तुम्हीही, जे याहवेहच्या आवासात, आमच्या परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात सेवा करतात.
याहवेहचे स्तवन करा, कारण ते चांगले आहेत; त्यांच्या नावाचा महिमा गा, कारण ते करणे मनोरम आहे.
कारण याकोबाला आपलेसे करावे, इस्राएलला त्यांची मौल्यवान संपत्ती म्हणून याहवेहने त्यांना निवडले.
मला माहीत आहे की याहवेह महान आहेत, ते देवाधिदेव आहेत.
याहवेह, स्वर्गात तसेच पृथ्वीवर, सागरांमध्ये आणि त्याच्या अत्यंत खोलात देखील, त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.
पृथ्वीच्या दिगंतापासून ते मेघ वर चढवितात; पर्जन्यवृष्टीसह ते विजा पाठवितात आणि आपल्या भांडारातून ते वारे प्रवाहित करतात.
तत्पश्चात त्यांची भूमी त्यांनी वतन म्हणून, आपली प्रजा इस्राएली लोकांना देऊ केली.
हे याहवेह, तुमचे नाव चिरकाल टिकते; तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकणारी आहे.
कारण याहवेह आपल्या लोकांना निर्दोष प्रमाणित करतील, आणि आपल्या सेवकांवर करुणा करतील.
हे संपूर्ण इस्राएला, याहवेहचे स्तवन कर; अहो अहरोनाच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा.
अहो, लेवीच्या वंशजांनो, याहवेहचे स्तवन करा; त्यांचे भय धरणार्या लोकांनो, याहवेहचे स्तवन करा.
सीयोनातून याहवेहचे स्तवन होवो, अहो यरुशलेमातील सर्व रहिवाशांनो, याहवेहचे स्तवन करा. याहवेहचे स्तवन करा.
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत, त्यांची करुणा सनातन आहे.
देवाधिदेवाचे उपकारस्मरण करा, त्यांची करुणा सनातन आहे.
प्रभूंच्या प्रभूचे आभार माना, त्यांची करुणा सनातन आहे.
केवळ तेच असे महान चमत्कार करू शकतात, त्यांची करुणा सनातन आहे.
ज्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने स्वर्गाची निर्मिती केली, त्यांची करुणा सनातन आहे.
त्यांनी जलावर पृथ्वीचा विस्तार केला, त्यांची करुणा सनातन आहे.
त्यांनी प्रचंड ज्योती निर्माण केल्या— त्यांची करुणा सनातन आहे.