God
God चा उल्लेख असलेली वचने
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. मी हर्षित झालो, जेव्हा ते मला म्हणाले, “चला आपण याहवेहच्या मंदिरात जाऊ.”
हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत.
आपले परमेश्वर याहवेह, यांच्या मंदिराप्रीत्यर्थ, तुझा उत्कर्ष व्हावा, अशी अभिलाषा करेन.
प्रवाशांचे आराधना गीत. मी माझी दृष्टी वर, तुमच्याकडे लावतो, तुम्ही जे स्वर्गात राजासनारूढ आहात.
जसा एखादा दास आपली दृष्टी आपल्या धन्याच्या हाताकडे लावतो, किंवा एखादी दासी आपल्या धनिणीच्या हाताकडे नजर लावते, तसेच दया आणि कृपा प्राप्त व्हावी म्हणून, आमची दृष्टी आमचे परमेश्वर याहवेहकडे लागलेली असते.
आम्हावर दया करा, हे याहवेह, आम्हावर दया करा, कारण आम्ही पुष्कळ तिरस्कार सहन केला आहे.
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. सर्व इस्राएलने हे कबूल करावे की— जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते, जर याहवेह आमच्या बाजूने नसते,
याहवेह धन्यवादित असोत; त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही.
आमच्या साहाय्याचा उगम, स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे.
प्रवाशांचे आराधना गीत. ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात.
यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात.
हे याहवेह, जे नीतिमान आहेत, ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा.
परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो.
प्रवाशांचे आराधना गीत. जेव्हा याहवेहनी सीयोनाला पुन्हा एकवार संपन्न केले, तेव्हा आम्ही स्वप्न पाहत होतो असे वाटले.
आमचे मुख हास्याने भरले होते आणि किती हर्षगीते आम्ही गाईली! तेव्हा विधर्मी राष्ट्रे म्हणाली: “पाहा याहवेहने त्यांच्यासाठी किती थोर कृत्ये केली आहेत.”
याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत, आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.
हे याहवेह, नेगेव नदीसारखी, आमची समृद्धी परत आम्हाला मिळू द्या.
प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना. याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्यांचे जागणे व्यर्थ आहे.
तुमचे पहाटे उठणे आणि रात्री उशीरापर्यंत अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे— कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे, प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
प्रवाशांचे आराधना गीत. जे याहवेहचे भय बाळगतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!
होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना हाच आशीर्वाद असणार.
याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.
परंतु याहवेह न्यायी आहेत; त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.”