मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमची सर्व वचने पूर्णपणे सत्य आहेत; तुमचे सर्व नीतियुक्त न्याय अनंतकाळचे आहेत.

  2. अधिपतींनी कारण नसताना माझा छळ केला, परंतु माझे हृदय केवळ तुमच्याच वचनांनी कंपित होते.

  3. मोठा धनसंचय सापडलेल्या मनुष्याला होतो, तसा मला तुमच्या अभिवचनांनी आनंद होतो.

  4. असत्याचा मी द्वेष व घृणा करतो, पण तुमच्या नियमांवर मी प्रीती करतो.

  5. तुमच्या नीतियुक्त नियमांबद्दल दिवसातून सात वेळा मी तुमचे स्तवन करतो.

  6. जे तुमच्या नियमांवर प्रीती करतात, त्यांना मोठी शांती लाभते, आणि ते कधीही विचलित होत नाहीत.

  7. याहवेह, तुमच्या तारणाची मी प्रतीक्षा करतो, आणि मी तुमच्या आज्ञा पाळतो.

  8. मी तुमच्या आज्ञांचे पालन करतो, कारण त्या मला अतिशय प्रिय आहेत.

  9. मी तुमचे उपदेश व नियम पाळतो, कारण माझा प्रत्येक मार्ग तुम्हाला माहीत आहे.

  10. हे याहवेह, माझी हाक तुम्हापर्यंत पोहचो; आपल्या वचनाप्रमाणे मला विवेकवंत करा.

  11. माझी प्रार्थना तुम्हापर्यंत पोहचो; तुम्ही आपल्या अभिवचनाप्रमाणे माझी सुटका करा.

  12. माझे ओठ भरभरून तुमचे स्तवन करो, कारण तुम्ही मला तुमचे विधी शिकविले आहेत.

  13. माझी जीभ तुमच्या वचनांची स्तुतिगीते गाओ, कारण तुमचे सर्व नियम नीतियुक्त आहेत.

  14. मला साहाय्य करण्यास तुमची भुजा सतत तयार राहो, कारण मी तुमच्या अधिनियमांचा स्वीकार केला आहे.

  15. हे याहवेह, मी तुमच्या तारणाची उत्कंठा धरलेली आहे; तुमचे नियम माझा अत्यानंद देतात.

  16. मला आयुष्यमान करा, जेणेकरून मी तुझी स्तुती करेन, आणि तुमचे नियम माझी जोपासना करोत.

  17. हरवलेल्या मेंढराप्रमाणे मी बहकलो, माझा शोध घ्या, कारण तुमच्या आज्ञा मी विसरलो नाही.

  18. प्रवाशांचे आराधना गीत. संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली.

  19. हे याहवेह, असत्य बोलणार्‍या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.

  20. स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते याहवेह, तेच माझ्या साहाय्यतेचा उगम आहेत.

  21. ते तुझा पाय कदापि घसरू देणार नाहीत; तुझे रक्षक डुलकीही घेत नाही.

  22. खरोखर जे इस्राएलचे रक्षक आहेत ते झोपी जात नाहीत किंवा डुलकीही घेत नाहीत.

  23. याहवेह स्वतः तुझे रक्षण करतात— याहवेह तुझ्या उजव्या हाताजवळ सावलीसारखे आहेत.

  24. याहवेह सर्व अनिष्टांपासून तुला सुरक्षित ठेवतील— आणि तुझ्या जिवाचे रक्षण करतील.

  25. तुझे आता आणि सर्वकाळ येणे व जाणे, यावर याहवेह बारकाईने लक्ष ठेवतील.