God
God चा उल्लेख असलेली वचने
त्यांचे भय बाळगणार्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात; त्यांचा धावा ते ऐकतात आणि त्यांना संकटमुक्त करतात:
जे त्यांच्यावर प्रीती करतात, याहवेह त्या सर्वांचे रक्षण करतात, परंतु ते सर्व दुष्टांचा नायनाट करतील.
माझे मुख याहवेहची उपकारस्तुती करेल. प्रत्येक प्राणिमात्र त्यांच्या पवित्र नावाचे युगानुयुग गौरव करोत.
याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.
आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन; माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,
गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात; तसेच भुकेल्यांस ते अन्न देतात; याहवेहच बंदिवानांना मुक्त करतात,
ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.
याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.
याहवेह सर्वकाळ राज्य करतील, हे सीयोना, तुझे परमेश्वर पिढ्यान् पिढ्या राज्य करतील. याहवेहचे स्तवन करा.
याहवेहचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाणे किती मनोरम, किती यथार्थ आहे!
यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे; इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत.
ते तार्यांची गणती करतात आणि त्यांनी प्रत्येकास नाव दिलेले आहे.
ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे; त्यांची बुद्धी अपरिमित आहे.
याहवेह नम्रजनांस आधार देतात, परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात.
याहवेहच्या उपकारस्तुतीची गीते गा; वीणेच्या साथीवर आमच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गा.
घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही, मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही.
याहवेह त्यांचे भय बाळगणार्यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात.
यरुशलेम, याहवेहचा महिमा कर; सीयोने, आपल्या परमेश्वराची स्तुती कर.
कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे.
ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात; त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो.
शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात.
ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्या थंडीपुढे कोण टिकेल?
परंतु नंतर ते उष्ण हवेला आज्ञा करतात, तेव्हा हिम वितळते आणि जलप्रवाह वाहू लागतो.
त्यांनी आपले वचन याकोबाला विदित केलेले आहेत आणि विधी व नियम इस्राएलला स्पष्ट केले आहेत.