God
God चा उल्लेख असलेली वचने
याहवेहचे भय म्हणजे जीवनाचा झरा आहे, ते मृत्यूच्या पाशांपासून त्याला वाचवते.
गरिबांवर जुलूम करणारा आपल्या उत्पन्नकर्त्याचा अपमान करतो; पण ज्यांना गरजवंताची दया येते, ते परमेश्वराचा सन्मान करतात.
याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत, सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते.
याहवेहना दुष्टांच्या अर्पणाचा वीट आहे, पण सात्विक लोकांची प्रार्थना त्यांना आनंद देते.
दुष्टांच्या मार्गाचा याहवेह तिरस्कार करतात, पण जे नीतिमत्तेचा माग धरतात, त्यांच्यावर ते प्रीती करतात.
मृत्यू आणि नाश याहवेह यांच्या दृष्टीपुढे आहेत— त्याअर्थी त्यांना मानवी हृदयाचे ज्ञान कितीतरी अधिक असेल!
अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.
गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.
दुष्टाच्या विचारांचा याहवेह द्वेष करतात, परंतु प्रेमळ शब्द त्यांच्या दृष्टीने निर्मळ असतात.
याहवेह दुष्टांपासून फारच दूर असतात, पण धार्मिकांच्या प्रार्थना मात्र ते ऐकतात.
याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय, आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.
अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते.
मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात.
तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील.
याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात. दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे.
याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते; आणि याहवेहचे भय धरल्यामुळे दुष्टता टाळली जाते.
जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात.
मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात.
प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत.
जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो.
आपण पदरात नाणेफेक करतो, पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो.
चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात.
दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे— अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात.
याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.