मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जे आहे, ते सर्व यापूर्वी झालेलेच आहे; जे होणार, तेही होऊन गेले आहे. गतकाळात होऊन गेले तेच परमेश्वर पुन्हा घडवून आणतील.

  2. मी स्वतःला म्हटले, “परमेश्वर नीतिमान आणि दुष्ट या दोघांचाही न्याय करणार, कारण प्रत्येक कृत्यांसाठी निर्धारित समय असणार, प्रत्येक कृत्यांचे न्याय होण्याची विशिष्ट वेळ.”

  3. मी स्वतःशी हे सुद्धा म्हणालो, “परमेश्वर मानवाची परीक्षा यासाठी घेतात की त्यांना हे समजावे की ते पशुवत् आहेत.

  4. परमेश्वराच्या मंदिरात जाताना तू तुझी पावले सांभाळ. बोध ऐकण्यासाठी परमेश्वराच्या समीप जा, मूर्ख लोकांसारखे यज्ञबली देण्यापेक्षा बरे, कारण आपण चूक करीत आहोत, हे त्यांना कळत नाही.

  5. बोलण्यात उतावळा असू नको, परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास आपल्या मनात घाई करू नकोस. कारण परमेश्वर स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.

  6. परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक.

  7. तुझ्या मुखाने तुला पाप करावयास लावू नये. “मी चुकून नवस केला” असे मंदिराच्या दूताला सांगून निषेध करू नकोस. तू जे बोलतो त्याबद्दल परमेश्वराने रागावून तुझ्या हाताचे कार्य नष्ट का करावे?

  8. पुष्कळ स्वप्ने बघणे व अधिक शब्द वापरणे व्यर्थ आहे. म्हणून परमेश्वराचे भय बाळग.

  9. आपल्या नगरात गरिबांवर अत्याचार होत असताना किंवा त्यांना न्याय आणि त्यांचे हक्क नाकारले जात असताना दिसल्यास त्याबद्दल आश्चर्य बाळगू नकोस; एक अधिकाऱ्याचे निरीक्षण करणारा वरिष्ठ अधिकारी आहे, आणि दोघांवर त्यांचा उच्चाधिकारी आहे.

  10. तरी एक चांगली गोष्ट मी पाहिली: मनुष्याने खावे, प्यावे व परमेश्वराने आपल्याला सूर्याखाली दिलेल्या या थोड्या दिवसाच्या कष्टमय जीवनात जे आहे, त्यात समाधान मानावे—हाच त्यांचा वाटा आहे.

  11. आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे.

  12. असे करणार्‍याला आपल्या भूतकाळाचे मनन करावे लागत नाही, कारण परमेश्वर त्याचे अंतःकरण आनंदाने भरून ठेवतो.

  13. परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे.

  14. जे काही अस्तित्वात आहेत त्याला आधी नाव दिलेले आहे, आणि मानवता तर ओळखीची होती; कोणीही जो आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही.

  15. परमेश्वराच्या कामावर मनन करा: त्यांनी जे वाकडे केले आहे ते कोण सरळ करू शकतो?

  16. जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा आनंद करा; परंतु जेव्हा वेळ प्रतिकूल असते, तेव्हा हे लक्षात घ्या: परमेश्वराने जशी अनुकूल वेळ निर्माण केली तशी प्रतिकूल वेळही त्यांनीच निर्माण केली, म्हणून कोणा व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल जाणून घेता येत नाही.

  17. पहिल्याला घट्ट धरून ठेवणे, आणि दुसर्‍यालाही सोडून न देणे हे बरे. जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील.

  18. मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की, एक स्त्री जी एक पाश आहे, जिचे हृदय एक सापळा आहे जिचे हात साखळीप्रमाणे आहेत. जे परमेश्वराला प्रसन्न करतात ते तिच्यापासून निसटतील, परंतु पापींना ती पाशात अडकवेल.

  19. एकच गोष्ट माझ्या लक्षात आली: परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली, परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.”

  20. मी म्हणतो, राजाच्या आज्ञेचे पालन करा, कारण तशी तुम्ही परमेश्वरासमोर शपथ घेतली आहे.

  21. जर एखादा दुष्ट मनुष्य शंभर गुन्हे करतो तरी तो दीर्घायुष्य जगतो, तरी मला माहीत आहे की जे परमेश्वराचे भय बाळगतात व जे त्यांचा आदर करतात त्यांचे अधिक हित होईल.

  22. दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही.

  23. म्हणून मी जीवनाच्या आनंदाची प्रशंसा केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे, व आनंद करावा, सूर्याखाली त्याहून अधिक चांगले काही नाही. तेव्हा सूर्याखाली परमेश्वराने दिलेल्या त्यांच्या कष्टदायक जीवनाच्या सर्व दिवसात, त्यांना आनंदाची साथ लाभेल.

  24. तेव्हा मी परमेश्वराने केलेले सर्वकाही पाहिले. सूर्याखाली होणार्‍या कार्याला कोणीही समजू शकत नाही. शोध घेण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही त्याचा अर्थ कळू शकत नाही. जरी सुज्ञ लोक ते माहीत असल्याचा दावा करतात, तरी त्यांनाही ते खचितच समजू शकत नाही.

  25. मी या सर्वांवर मनन केले आणि हा निष्कर्ष काढला की नीतिमान व सुज्ञ आणि ते जे काही करतात ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढे प्रेम किंवा द्वेष यापैकी काय ठेवले आहे हे कोणा मनुष्याला माहीत नसते.