मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “मी इजिप्तच्या लोकांना इजिप्तच्या लोकांविरुद्ध चिथावेन— भाऊ भावाविरुद्ध लढेल, शेजारी शेजार्‍याविरुद्ध, शहर शहराविरुद्ध, राज्य राज्याविरुद्ध.

  2. इजिप्तच्या लोकांचे हृदय खचून जाईल, आणि मी त्यांच्या योजना विफल करेन; मूर्तींबरोबर आणि मृतात्म्यांबरोबर, माध्यमांशी आणि भूतविद्या करणाऱ्यांशी ते सल्लामसलत करतील.

  3. मी इजिप्तच्या लोकांना क्रूर धन्याच्या सत्तेच्या स्वाधीन करेन, आणि एक भयंकर राजा त्यांच्यावर राज्य करेल,” असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

  4. आता तुमची ज्ञानी माणसे कुठे आहेत? त्यांनी तुम्हाला दाखवावे किंवा तुमच्यापुढे यावे आणि माहीत करून द्यावे, कि सर्वसमर्थ याहवेह यांनी इजिप्तविरुद्ध काय योजना केली आहे.

  5. याहवेहनी त्यांच्यामध्ये भोंवळ येण्याचा आत्मा ओतला आहे; त्यामुळे इजिप्तच्या सर्व कामात ती लटपटते, जसा मद्यपी, त्याने केलेल्या ओकारी भोवती फिरतो.

  6. त्या दिवशी इजिप्तचे लोक दुर्बल होतील. सर्वसमर्थ याहवेहनी त्यांच्याविरुद्ध उगारलेल्या हाताच्या धाकामुळे ते घाबरून थरकापतील.

  7. यहूदीयाची भूमी इजिप्तच्या लोकांवर दहशत आणेल; आणि सर्वसमर्थ याहवेह जी योजना त्यांच्याविरुद्ध करीत आहेत, त्यामुळे कोणी यहूदीयाचा उल्लेख केलेला ऐकताच ते घाबरून जातील.

  8. त्या दिवशी इजिप्तमधील पाच शहरे कनान देशाची भाषा बोलतील आणि सर्वसमर्थ याहवेह यांच्याबरोबर एकनिष्ठतेची शपथ घेतील. त्यापैकी एकाला सूर्याचे शहर म्हटले जाईल.

  9. त्या दिवशी इजिप्तच्या मध्यभागी याहवेहसाठी वेदी असेल आणि त्यांच्या सीमेवर याहवेह यांचे स्मारक असेल.

  10. इजिप्त देशामध्ये सर्वसमर्थ याहवेहसाठी ते एक चिन्ह आणि साक्ष असतील. जेव्हा ते त्यांच्या जुलमी लोकांमुळे याहवेहकडे धावा करतील, तेव्हा ते त्यांच्याकडे एक तारणारा आणि रक्षक पाठवतील आणि ते त्यांना सोडवतील.

  11. तेव्हा याहवेह स्वतःला इजिप्तच्या लोकांस प्रगट करतील आणि त्या दिवशी ते याहवेह यांना स्वीकारतील. यज्ञार्पणे आणि धान्यार्पणे यांच्यासहित ते आराधना करतील; ते याहवेहकडे शपथ वाहतील आणि त्याचे पालन करतील.

  12. याहवेह इजिप्तवर महामारीच्या साथीने हल्ला करतील; ते त्यांच्यावर हल्ला करतील आणि त्यांना बरे करतील. ते याहवेहकडे वळतील आणि ते त्यांच्या विनवणीला प्रतिसाद देतील आणि त्यांना बरे करतील.

  13. सर्वसमर्थ याहवेह त्यांना आशीर्वाद देतील आणि म्हणतील, “इजिप्तमधील माझे लोक आशीर्वादित असावेत, अश्शूर माझी हस्तकला आणि इस्राएल माझे वतन असो!”

  14. त्यावेळेस आमोजचा पुत्र यशायाहद्वारे याहवेह बोलले. ते त्याला म्हणाले, “तुझ्या अंगावरील गोणपाट आणि पायातील चपला काढून टाक.” आणि त्याने तसे केले, वस्त्रहीन आणि अनवाणी असा तो फिरत राहिला.

  15. तेव्हा याहवेह म्हणाले, “जसा माझा सेवक यशायाह तीन वर्षे विवस्त्र आणि अनवाणी चालला, त्याचप्रमाणे इजिप्त व कूश यांच्याविरुद्ध हे चिन्ह आणि अरिष्टसूचक गोष्ट असेल,

  16. माझे अंतःकरण अडखळते, भीती मला थरथर कापविते; ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे.

  17. प्रभू मला असे म्हणत आहेत: “जा, टेहळणी करणारा उभा कर, आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे.

  18. पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे. आणि तो प्रत्युत्तर देत आहे: ‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे! तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”

  19. माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत, इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून, मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.

  20. प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल.

  21. केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.

  22. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांचा एक दिवस आहे दृष्टान्ताच्या खोऱ्यामध्ये गोंधळाचा, तुडविण्याचा आणि दहशतीचा, भिंती तोडून पाडण्याचा दिवस आणि पर्वतातून ओरडण्याचा दिवस आहे.

  23. जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींमध्ये हौद बांधला, परंतु ज्यांनी तो तयार केला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही, किंवा ज्यांनी ते फार पूर्वीपासून योजले होते, त्यांना आदर दिला नाही.

  24. प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी, तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी, त्या दिवशी तुम्हाला बोलावतील.

  25. सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.