मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण सर्वसमर्थ याहवेह त्याच्याबरोबर होते.

  2. दावीदाच्या काही अत्यंत शूर योद्ध्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—याहवेहच्या कराराप्रमाणे या योद्ध्यांनी इस्राएली पुढार्‍यांसह राज्याची वाढ करण्यासाठी त्याला मजबूत आधार दिला.

  3. परंतु ते त्या शेताच्या मध्यभागी उभे राहिले, त्यांनी सामना केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला.

  4. तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.

  5. त्याने म्हटले, “परमेश्वर न करो मला ते करावे लागेल. ज्या पुरुषांनी ते आपला जीव धोक्यात घालून आणले त्यांचे रक्त मी प्यावे काय?” कारण ते आणण्यासाठी त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला होता. त्यामुळे दावीद ते पाणी प्याला नाही. अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती.

  6. दावीद त्यांच्या भेटीसाठी बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही मला मदत करावयास शांतीने आला असाल, तर तुम्हाला सहभागी करण्यास मी तयार आहे. पण मी निरपराध असताना मला शत्रूंच्या हवाली करण्यासाठी, माझा विश्वासघात करावयास तुम्ही आला असाल, तर आपल्या पूर्वजांचा परमेश्वर तुम्हाला पाहून घेईल व तुमचा न्याय करेल.”

  7. तेव्हा त्या तिसांचा पुढारी अमासयवर पवित्र आत्मा आला आणि अमासय म्हणाला: “दावीद महाराज, आम्ही तुमचे आहोत! अहो इशायपुत्र, आम्ही तुमच्या बाजूचे आहोत! तुम्हाला शांती, कल्याण लाभो, आणि जे तुम्हाला मदत करतील, त्या सर्वांना यश लाभो. कारण तुमचे परमेश्वर तुम्हाला मदत करतील.” मग दावीदाने त्यांचा स्वीकार केला आणि त्यांना आपल्या गनिमी युद्धाच्या सेनेवर अधिकारी नेमले.

  8. दररोज लोक दावीदाला येऊन मिळत होते. शेवटी त्याच्याकडे परमेश्वराच्या सेनेसारखी प्रचंड सेना जमा झाली.

  9. दावीद हेब्रोन येथे असताना, त्याला अनेक कसलेले योद्धे येऊन मिळाले. याहवेहने वचन दिल्याप्रमाणे दावीदाला शौलाच्या जागी राजा होण्यास मदत करावी या उद्देशाने ते आले होते.

  10. जमलेल्या संपूर्ण इस्राएली सभेपुढे दावीदाने असे भाषण केले, “जर तुम्हाला योग्य वाटते आणि आपल्या याहवेह परमेश्वरानेही या गोष्टीला संमती दिली आहे, त्याअर्थी आपल्यात सामील होण्यासाठी, आपण इस्राएलातील सर्व बंधूना, तसेच याजक, लेवी, जे त्यांच्यासह नगरात व मळ्यात आहेत त्यांना आमंत्रणाचा संदेश पाठवू या.

  11. त्याचप्रमाणे आपण आपल्या परमेश्वराचा कोश परत आणू या. कारण शौल राजाच्या कारकिर्दीत आपण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.”

  12. मग दावीदाने परमेश्वराचा कोश किर्याथ-यआरीमहून आणण्याच्या वेळी इजिप्तच्या शिहोर नदीपासून ते लबो हमाथपर्यंत सर्वत्र विखुरलेल्या इस्राएली लोकांना एकत्र केले.

  13. दावीद व इस्राएलचे सर्व लोक यहूदीयातील बालाह म्हणजे किर्याथ-यआरीम येथे, जो त्या नावाने संबोधित केला जातो, सर्वसमर्थ याहवेह परमेश्वराचा कोश, जे करुबांमध्ये आरूढ आहेत, तो आणण्यासाठी निघाले.

  14. त्यांनी परमेश्वराचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अहियो हे बैलगाडी चालवित होते.

  15. दावीद आणि इस्राएलचे सर्व लोक त्यांच्या सर्व शक्तीने परमेश्वरासमोर वीणा, सारंगी, डफ, डमरू, झांजा व कर्णे वाजवित आनंद करीत होते.

  16. त्यामुळे याहवेहचा कोप उज्जाहविरुद्ध पेटला आणि त्याने कोशाला हात लावला म्हणून त्यांनी त्याला मारून टाकले. आणि तो परमेश्वरापुढे मरण पावला.

  17. तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात.

  18. त्या दिवशी दावीदाला परमेश्वराचे भय वाटले, तो म्हणाला, “परमेश्वराचा कोश मी आपल्याकडे कसा नेऊ?”

  19. परमेश्वराचा कोश ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याच्या घराण्यास व त्याचे जे काही होते त्या सर्वास आशीर्वाद दिला.

  20. आणि दावीदाने जाणले की याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य खूप उंचावले आहे.

  21. तेव्हा दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?” याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, मी त्यांना तुझ्या हातात देईन.”

  22. म्हणून दावीद व त्याचे सैन्य बआल-पेरासीम येथे गेले आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वराने माझ्याद्वारे शत्रूंचा नाश केला आहे.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम, हे नाव पडले.

  23. तेव्हा दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “थेट त्यांच्यामागे जाऊ नकोस, पण त्यांच्या बाजूने वळसा देऊन, तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर.

  24. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, युद्धास पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.”

  25. तेव्हा दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्टी सैन्याला ठार केले.