मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. राजा त्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि नियमांचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराची पुष्टी केली. नंतर सर्व लोकांनी आपणास त्या कराराशी वचनबद्ध केले.

  2. राजाने मुख्य याजक हिल्कियाह, इतर याजक आणि मंदिराचे द्वारपाल यांना सूचना दिली की याहवेहच्या मंदिरातील, बआल व अशेरा, सूर्य, चंद्र आणि तारे यांची उपासना करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू नष्ट कराव्या. राजाने त्या सर्व वस्तू यरुशलेमा बाहेर किद्रोनच्या खोऱ्यातील एक शेतात जाळून टाकल्या आणि त्यांची राख बेथेलास नेली.

  3. त्याने याहवेहच्या मंदिरातून अमंगळ अशेरामूर्ती काढून टाकली आणि ती यरुशलेमबाहेर किद्रोनच्या खोऱ्याजवळ नेली. तिथे त्याने ती पूर्ण जाळली आणि तिची राख केली आणि ती राख सामान्य लोकांच्या कबरांवर फेकून दिली.

  4. याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत.

  5. जरी उच्च स्थानांच्या मंदिराचे याजक यरुशलेमातील याहवेहच्या वेदीवर सेवा करीत नसत, तरीही ते इतर याजकांच्या बेखमीर भाकरीचे भोजन करावयास बसत असत.

  6. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले.

  7. यहूदीयाच्या राजांनी राजवाड्यात आहाज राजाच्या खोलीच्या छतावर उभारलेल्या वेद्याही त्याने पाडून टाकल्या. याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेहने बांधलेल्या वेद्या सुद्धा त्याने नष्ट केल्या. त्यांचा चुराडा करून त्यांची धूळ त्याने किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिली.

  8. योशीयाहने चौफेर नजर फिरविली, तेव्हा त्याला डोंगराच्या बाजूला कित्येक कबरा आढळल्या, त्याने आपल्या सेवकांना आज्ञा केली की त्या कबरांमधील हाडे जमा करून ती बेथेलमधील वेदीवर जाळून ती वेदी भ्रष्ट करावी. जेव्हा यरोबोअम सणाच्या वेळी वेदीजवळ उभा राहिला होता तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहच्या संदेशानुसार भविष्यवाणी केली होती तसेच हे घडले.

  9. राजाने विचारले, “पलीकडे जे कबरेचे स्मारक दिसते ते कोणाचे आहे?” तेव्हा शहरातील लोकांनी त्याला सांगितले, “हे परमेश्वराच्या संदेष्ट्याचे स्मारक आहे, जो यहूदीयातून आला होता आणि बेथेलच्या वेदीची नुकतीच जी पाडापाड केली, त्यासंबंधीचे भाकीत ज्या संदेष्ट्याने केले होते, त्याची ती कबर आहे.”

  10. त्याने योशीयाहने बेथेलप्रमाणेच शोमरोनाच्या नगराच्या टेकड्यांवरील सर्व मंदिरे नष्ट केली. इस्राएलाच्या निरनिराळ्या राजांनी ती बांधली होती. यामुळे याहवेहला या गोष्टीचा फार क्रोध आलेला होता.

  11. राजाने सर्व लोकांना आदेश दिला: “कराराच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे याहवेह तुमच्या परमेश्वराकरिता वल्हांडण सण साजरा करा.”

  12. हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या अठराव्या वर्षी यरुशलेममध्ये याहवेहसाठी साजरा करण्यात आला.

  13. योशीयाहने यहूदीया व यरुशलेममधील प्रेत साधक, भूतविद्या करणारे, कुलदैवते व मूर्ती, आणि सर्वप्रकारच्या घृणास्पद वस्तू काढून टाकल्या. हिल्कियाह याजकाला याहवेहच्या मंदिरात आढळलेल्या नियमांच्या पुस्तकात जे लिहिले होते ते पूर्ण करण्यासाठी त्याने असे केले.

  14. योशीयाह सारखा कोणीही राजा त्याच्या आधी व त्याच्यानंतर झाला नाही ज्याने याहवेहकडे वळून मोशेचे नियमशास्त्र पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्णशक्तीने पाळले.

  15. इतके होऊनही यहूदीयाच्या विरुद्ध आलेला याहवेहचा महाक्रोध कमी झाला नव्हता, मनश्शेह राजाने जी दुष्टता केली होती त्यामुळे त्यांचा यहूदाहवरचा राग कमी झाला नाही.

  16. म्हणून याहवेहने म्हटले, “इस्राएलप्रमाणे मी यहूदीयालाही माझ्या उपस्थितीतून काढून टाकेन आणि मी स्वतः ज्या नगरीला निवडले होते त्या यरुशलेमचा आणि या मंदिराचाही ज्याबद्दल मी म्हटले होते, ‘तिथे माझे नाव राहील’ त्यांचा त्याग करेन.”

  17. त्याने आपल्या पूर्वजांच्या प्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  18. त्याच्या पूर्वजांच्या प्रमाणे त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  19. याहवेहने यहूदाहचा नाश करण्यासाठी यहूदीयावर खास्द्यांच्या, अरामी, मोआबी व अम्मोनी यांच्या टोळ्या पाठविल्या, असे घडणार हे भविष्य याहवेहने आपल्या संदेष्ट्याद्वारे आधी केलेले होते.

  20. निश्चितच याहवेहच्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना आपल्या उपस्थितीतून घालून द्यावे म्हणून हे संकट यहूदीयावर आले, कारण मनश्शेहचे पाप आणि त्याने जे सर्व केले,

  21. त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले.

  22. त्याने त्याच्या पित्याप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  23. याहवेहने घोषणा केल्याप्रमाणे, नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व संपत्ती लुटून नेली आणि इस्राएलाच्या शलोमोन राजाने याहवेहच्या मंदिरासाठी ठेवलेले सोन्याचे कटोरे तोडून त्यांचे तुकडे केले.

  24. यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

  25. यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.