मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत जाळून भस्म केली.

  2. बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि ते कास्य बाबेलास घेऊन गेले.

  3. याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते.

  4. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)

  5. याबेसाने इस्राएलाच्या परमेश्वराजवळ प्रार्थना केली, “तुम्ही मला आशीर्वादित करा, माझ्या क्षेत्राचा विस्तार करा! माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन, मला क्लेश वाटू नये म्हणून तुमचा हात माझ्यावर राहो.” परमेश्वराने त्याची विनंती मान्य केली.

  6. त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली.

  7. बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.

  8. ते आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराशी अविश्वासू झाले आणि परमेश्वराने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता, त्यांच्या दैवतांच्या नादी लागून ते व्यभिचारी बनले.

  9. यास्तव इस्राएलाच्या परमेश्वराने अश्शूरचा राजा पूल (म्हणजे अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर), यास तयार केले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या वंशाच्या लोकांचा पाडाव करून त्यांना हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत नेऊन बंदिवासात ठेवले व तिथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.

  10. याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.

  11. कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:

  12. यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत.

  13. त्यांच्या लेवी भाऊबंदांना परमेश्वराच्या भवनाच्या निवासमंडपातील सर्व सेवेसाठी समर्पित करण्यात आलेले होते.

  14. अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत.

  15. अजर्‍याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता;

  16. जे कुटुंबप्रमुख होते, त्या 1,760 याजकांची नोंद झाली. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवाकार्यास हे पुरुष जबाबदार होते.

  17. शल्लूम जो कोरेचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहचा पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील त्याचे द्वारपाल भाऊबंद जे कोरही होते, त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक केलेली असून, ते त्यांच्या पूर्वजांसारखे याहवेहच्या भवनाच्या व्दाराची रखवाली करीत.

  18. पूर्वीच्या काळी एलअज़ारचा पुत्र फिनहास या सर्वांवर द्वारपालांचा अधिकृत अधिकारी होता. याहवेहचे सानिध्य त्यांच्याबरोबर होते.

  19. ते व त्यांचे वंशज याहवेहच्या भवनाच्या म्हणजे सभामंडपाच्या द्वारपालाचे काम पाहत असत.

  20. परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती.

  21. परमेश्वराच्या भवनाचे रक्षण त्यांच्याकडे सोपविले असल्यामुळे रात्री ते मंदिराच्या आसपास राहत असत आणि दररोज सकाळी परमेश्वराचे भवन उघडण्यासाठी चावी त्यांच्याच ताब्यात असे.

  22. याहवेहशी अविश्वासू राहिल्यामुळे शौलाला मृत्यू आला; कारण त्याने याहवेहची आज्ञा न पाळता, एका भूतविद्याप्रवीण स्त्रीचा सल्ला घेतला,

  23. आणि याहवेहचे मार्गदर्शन नाकारले, यामुळे याहवेहने त्याचा वध केला आणि त्याचे राज्य इशायाचा पुत्र दावीदास सोपविले.

  24. मागील काळात, जेव्हा शौल राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”

  25. जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.