God
God चा उल्लेख असलेली वचने
त्याने आपल्याच पुत्राचे अग्नीत अर्पण केले, जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट तसे पुष्कळ काही करून याहवेहचा राग पेटविला.
त्याने घडविलेली कोरीव अशेराची स्तंभे घेतली व मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी याहवेह, दावीद व त्याचा पुत्र शलोमोनला म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.
जर ते केवळ माझा सेवक मोशेने दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांचे पाय भटकू देणार नाही.”
परंतु लोकांनी ऐकले नाही. मनश्शेहने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणून त्यांनी ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता अशा राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.
त्यावेळी याहवेहने आपले सेवक संदेष्ट्यांद्वारे म्हटले होते:
म्हणून याहवेह इस्राएलांचे परमेश्वर म्हणतात: पाहा, मी यरुशलेम व यहूदीया यांच्यावर असे भयंकर संकट आणेन की, त्याबद्दल जे लोक ऐकतील, त्यांचे कान भणभणतील.
मी माझ्या वतनातील उर्वरित लोकांना नाकारीन आणि त्यांना शत्रूंच्या हाती देईन. त्यांचे सर्व शत्रू त्यांना लुटतील आणि ते त्यांचे भक्ष्य असे होतील;
त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते केले आहे आणि माझा क्रोध भडकविला आहे.”
शिवाय, मनश्शेहने इतके निष्पाप रक्त सांडले की यरुशलेम पूर्ण रक्ताने भरून गेले—त्याने यहूदाहला जे पाप करावयाला लावले होते त्या शिवाय त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.
त्याने आपला पिता मनश्शेहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
त्याने याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराला सोडले आणि त्यांच्या मार्गात चालला नाही.
याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याचे पूर्वज दावीदच्या मार्गांचे पूर्णपणे पालन केले.
त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाह राजाने मशुल्लामचा पुत्र, अजल्याहचा पुत्र व त्याचा चिटणीस शाफानला याहवेहच्या मंदिरात पाठवले. त्याने म्हटले:
“मुख्य याजक हिल्कियाहकडे जा व याहवेहच्या मंदिरात आलेले पैसे, जे द्वारपालांनी गोळा केले होते ते याजकांनी तयार ठेवावे.
त्यांनी ते मंदिरातील कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या पुरुषांकडे सोपवावे. आणि या लोकांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करणार्या कामगारांना द्यावे—
मुख्य याजक हिल्कियाहने शाफान चिटणीसाला म्हटले, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” त्याने तो शाफानकडे दिला, ज्याने ते वाचले.
मग शाफान चिटणीस राजाकडे गेला आणि त्याला अहवाल दिला: “तुझ्या सेवकांना जे पैसे याहवेहच्या मंदिरासाठी मिळाले, त्यांनी ते मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्यांच्या हाती दिले आहेत.”
“जा आणि माझ्यासाठी आणि लोकांसाठी आणि सर्व यहूदीयासाठी, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर पेटला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”
ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा,
‘याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने वाचलेल्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे त्यानुसार मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन.
कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हातांनी तयार केलेल्या सर्व मूर्तींमुळे त्याने माझा राग पेटविला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’
ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले आहे त्या यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ‘जे वचन तुम्ही ऐकले त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:
कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे आहे आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध मी जे काही बोललो ते तू ऐकले; की ते शापित होऊन ओसाड पडतील, तेव्हा तू स्वतःला नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात.
म्हणून मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी परत जाऊन तिचे उत्तर राजाला सांगितले.
यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि संदेष्टे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले.