मुख्य मजकुरावर जा

Young Men बद्दल बायबलमधील वचने

347 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. प्रामाणिकपणाने दिलेले उत्तर मिळणे म्हणजे ओठांवरील चुंबनासारखे आहे.

  2. तुझे बाहेरचे काम योग्यप्रकारे पूर्ण कर आणि तुझे शेत तयार कर; त्यानंतर, तुझे घर बांध.

  3. विनाकारण तुझ्या शेजार्‍याविरुद्ध साक्ष देऊ नकोस— गैरसमज करून देण्यासाठी तू तुझ्या जिभेचा उपयोग करावा काय?

  4. असे म्हणू नकोस, “ते जसे माझ्याशी वागले आहेत तसेच मी त्यांच्याशी वागेन; त्यांनी जसे माझे केले तशीच मी त्यांची परतफेड करेन.”

  5. एका आळशी मनुष्याच्या शेताच्या बाजूने मी गेलो, ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही अशा माणसाच्या द्राक्षमळ्याच्या बाजूने मी गेलो;

  6. सर्वत्र काटेरी झुडपे उगविलेली होती, आणि संपूर्ण भूमी तणाने झाकली गेलेली होती; त्याचे दगडी कुंपणही ढासळले होते.

  7. जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो आणि जे काही मी पाहिले त्यापासून एक धडा शिकलो:

  8. आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती—

  9. आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि सशस्त्र मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.

  10. माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर; म्हणजे जे मला तिरस्काराने वागवितात, मी त्यांना उत्तर देऊ शकेन.

  11. सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो, परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो.

  12. ज्या मनुष्याला ज्ञान प्रिय आहे, तो त्याच्या वडिलांना आनंदी करतो, परंतु वेश्यांच्या सहवासात राहणारा आपले धन उधळतो.

  13. राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत.

  14. माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक! माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक!

  15. तुझी शक्ती स्त्रियांच्या सहवासात घालवू नको. जे राजांचा नाश करतात, त्यांच्यासाठी तुझे बळ घालवू नको.

  16. म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात: “त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’ त्याच्यासाठी ते शोक करणार नाही: ‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’

  17. त्याला मेलेल्या गाढवासारखी मूठमाती देण्यात येईल— त्याला सिंहासनावरून फरफटत आणून यरुशलेमच्या द्वाराबाहेर फेकतील!”

  18. “लबानोनात जा व विलाप करा, बाशानात तुमचा आवाज ऐकू आला पाहिजे, अबारीमाहून आरोळी मारा, कारण तुमचे सर्व मित्र चिरडले गेले आहेत.

  19. तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता, परंतु तुम्ही उत्तर दिले, ‘मी ऐकणार नाही!’ लहानपणापासून तुम्ही असेच आहात; तुम्ही आज्ञापालन केलेच नाही!

  20. आता एक मनुष्य येशूंकडे आला व त्यांना विचारले, “गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी कोणत्या चांगल्या गोष्टी कराव्या?”

  21. तेव्हा येशूंनी त्याला म्हटले, “तू मला उत्तम काय आहे हे का विचारतोस? फक्त परमेश्वरच खर्‍या अर्थाने उत्तम आहेत. पण तू आज्ञा पाळ म्हणजे तुला जीवनात प्रवेश मिळेल.”

  22. “कोणत्या आज्ञा?” त्याने विचारले. येशूंनी उत्तर दिले, “ ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको,

  23. तुझ्या आई आणि वडिलांचा मान राख,’ आणि ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ ”

  24. तो तरुण म्हणाला, “या सर्व मी पाळल्या आहेत. मी अजून कशात उणा आहे?”

  25. येशू म्हणाले, “तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”