मुख्य मजकुरावर जा

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पाप करावयाला त्यांचे पाय धाव घेतात; निर्दोषाचा रक्तपात करण्यास ते चपळ असतात. ते दुष्ट योजनेचा पाठपुरावा करतात; हिंसात्मक कृत्यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,

  2. आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही; त्यांच्या वाटेवर न्याय नसतो. त्यांनी ते मार्ग वाकडे करून टाकले आहेत; त्यांच्यासोबत चालणाऱ्या कोणासही शांतीचा अनुभव येत नाही.

  3. तुम्ही प्राचीन काळापासून अस्तित्वात आहात; पण तुम्ही त्यांच्यावर राज्य केले नाही, ते तुमच्या नावाने संबोधले जात नाहीत.

  4. म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “माझ्या सेवकांना अन्न मिळेल, पण तुम्ही उपाशी राहाल; माझ्या सेवकांना पेय मिळेल, पण तुम्ही तहानेने व्याकूळ व्हाल. माझे सेवक हर्षोल्हास करतील, पण तुम्हाला लज्जास्पद केले जाईल.

  5. त्यांच्या अंतःकरणातून उफाळणार्‍या आनंदाने माझे सेवक गाणी गातील, पण अंतःकरणातील क्लेशांनी तुम्ही विव्हळाल आणि भग्नहृदयी होऊन हृदयाच्या वेदनेने आकांत कराल.

  6. तुम्ही स्वतःला साबणाने धुतले आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.

  7. “तुम्हाला कसे म्हणता येईल ‘मी अशुद्ध नाही; मी बआल दैवताच्या मागे गेलो नाही’? दरीत जाऊन तुम्ही कसे वागले ते पाहा, तुमच्या आचरणाबद्धल विचार करा. इकडे तिकडे पळणार्‍या चपळ उंटिणीसारखे तुम्ही आहात.

  8. वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात, तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात; तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा? कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये; संभोगासमयी त्यांना ती सापडेल.

  9. तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको, आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे. परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही! मी परकीय दैवतावर प्रेम करतो, आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’

  10. तू नेहमीसाठी रागावला आहेस का? हा क्रोध नेहमीसाठी राहील काय?’ याप्रकारे तू बोलतेस, परंतु तू करता येईल ते सर्वप्रकारचे कुकर्म करतेस.”

  11. “माझे लोक मूर्ख आहेत; ते मला ओळखत नाही. ते असमंजस मुलांसारखे आहेत. त्यांना समज अजिबात नाही. दुष्ट कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे; त्यांना चांगले कार्य करावयाचे माहीत नाही.”

  12. मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.

  13. मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.

  14. तुमच्या अपराधांमुळे तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर आहात; तुमच्या पातकांमुळे तुम्ही उत्तम गोष्टींना मुकले आहात.

  15. “माझ्या लोकांमध्ये दुष्ट लोक आहेत शिकारी जसा आडोशाला दबा धरून पक्षांची वाट बघतो, तसे ते माणसांना पकडण्यासाठी सापळे लावतात.

  16. पक्ष्यांनी खुराडे भरलेले असावे, तशी त्यांची घरे कपटाने भरलेली आहेत, म्हणून आता ते बलवान व श्रीमंत बनले आहेत.

  17. ते खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाले आहेत. त्यांच्या दुष्कर्मांना मर्यादाच नाही; ते न्याय करीत नाहीत. अनाथांच्या न्यायाचा पाठपुरावा करीत नाहीत; आणि गरिबांच्या रास्त हक्काचे समर्थन करत नाहीत.

  18. ज्याप्रमाणे विहिरीच्या झऱ्यातून पाणी बाहेर वाहते, तशी तिची दुष्टाई झर्‍याप्रमाणे उफाळून येते. तिच्या रस्त्यारस्त्यातून हिंसाचार व विनाशाचे आवाज घुमतात; तिचे रोग व तिच्या जखमा सदोदित माझ्या नजरेसमोर आहेत.

  19. त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का? नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही; लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही. म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील; मी जेव्हा त्यांना शिक्षा देईल तेव्हा त्यांचे पतन होईल,” असे याहवेह म्हणतात.

  20. याहवेह म्हणाले, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत असताना, मी तुमच्याशी वारंवार बोललो, परंतु तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हाला हाक मारली, पण मला उत्तर दिले नाही.

  21. म्हणून माझे नाव धारण केलेले मंदिर, ज्याच्यावर तुम्ही भरवसा ठेवता, जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले होते, आता त्या मंदिराचे, मी शिलोहचे केले तसेच करेन.

  22. मी तुम्हाला माझ्या उपस्थितीतून दूर लोटेन, जसे तुमचे इस्राएली भाऊबंद, म्हणजे एफ्राईमच्या लोकांना केले तसे करेन.’

  23. पण मी अशी आज्ञा दिली होती की: माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल. मी सांगतो ते सर्व पालन करा, म्हणजे तुमचे कल्याण होईल.

  24. पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; याउलट, स्वतःच्या अंतःकरणाच्या हट्टी व दुष्ट विचारांना अनुसरले. ते पुढे जाण्याऐवजी त्यांची माघारच झाली.

  25. तुमच्या पूर्वजांनी इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून आजपर्यंत, दिवसेंदिवस, पुन्हापुन्हा मी माझे संदेष्टे पाठवित राहिलो.