मुख्य मजकुरावर जा

Wicked बद्दल बायबलमधील वचने

724 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याजक, संदेष्टे व सर्व लोकांनी यिर्मयाहने याहवेहची आज्ञापिलेली वचने सांगितलेले ऐकले.

  2. मग यिर्मयाह सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व लोकांना म्हणाला: “या मंदिराविरुद्ध आणि या शहराविरुद्ध तुम्ही ऐकलेल्या सर्व गोष्टीसाठी भविष्यवाणी करण्यासाठी याहवेहने मला पाठविले आहे.

  3. आता तुम्ही तुमचे मार्ग, तुमची कर्मे बदला व याहवेह तुमचे परमेश्वर यांच्या आज्ञा पाळा. मग ते त्यांचे मन बदलतील व तुमच्याविरुद्ध जाहीर केलेली सर्व संकटे रद्द करतील.

  4. होय, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन, व त्यांना नासक्या आणि खाण्यास अयोग्य अशा अंजिरासारखे करेन.

  5. मी त्यांचा तलवार, दुष्काळ व मरीने पाठलाग करेन, जगभरातील सर्व राष्ट्राचे लोक त्यांची घृणा करतील, व त्यांना मी जिथेही हाकलून लावले तेथील लोक शाप देतील, त्यांची नाचक्की करतील, त्यांची चेष्टा करतील.

  6. कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही, माझी वचने घेऊन माझे सेवक संदेष्टे मी त्यांच्याकडे पुनः पुन्हा पाठविले, परंतु तुम्ही बंदिवानांनीही माझे ऐकण्यास नकार दिला,” असे याहवेह जाहीर करतात.

  7. “याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी जखम असाध्य आहे, तुझा घाव बरा होण्यापलिकडे आहे.

  8. तुझे समर्थन करण्यासाठी कोणीही नाही, तुझ्या दुखापतीवर काहीही इलाज नाही, तुला आरोग्य प्राप्त होणार नाही.

  9. तुझे सर्व मित्रगण तुला विसरले आहेत; त्यांना तुझी चिंता नाही; एखाद्या शत्रुगत मी तुला जखमी केले आहे निर्दयागत मी तुला शासन केले, कारण तुझा अपराध फार मोठा आहे तुझी पातके पुष्कळ झाली आहेत.

  10. तुझ्या जखमेबद्दल तू विलाप का करतोस, तुझ्या दुखण्यावर काहीही इलाज नाही का? कारण तुझा अपराध खूप मोठा व तुझी पातके अनेक आहेत म्हणून मी तुझ्याशी असा व्यवहार केला.

  11. जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.

  12. तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये.

  13. परंतु इस्राएल लोक तुझे ऐकत नाही कारण ते माझे वचन ऐकू इच्छित नाही, कारण सर्व इस्राएली लोक कठोर व हट्टी आहेत.

  14. म्हणून मी त्यांच्याशी क्रोधाने वागेन; मी त्यांच्याकडे दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही. जरी ते माझ्या कानात रडतील, तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”

  15. तुम्ही तलवारीने पडाल आणि इस्राएलच्या सीमांवर मी तुमच्यावर न्याय आणेन. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  16. आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे, कारण तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही किंवा माझे विधी मानले नाही, परंतु तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या मापांप्रमाणे तुम्ही वागला.”

  17. देशातील लोकांना सांग: ‘इस्राएल व यरुशलेमात राहणार्‍यांविषयी सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ते त्यांचे अन्न चिंतेने खातील व आपले पाणी घाबरत पितील, कारण त्यात राहणार्‍या लोकांच्या क्रूरतेमुळे त्यांच्या देशात असलेले सर्वकाही काढून टाकले जाईल.

  18. वसलेली नगरे ओसाड होतील आणि भूमी उजाड होईल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”

  19. तू त्यांच्या मार्गांचे केवळ अनुसरण करून त्यांची अमंगळ कृत्ये अंमलात आणली नाही, तर लवकरच तू त्यांच्याहीपेक्षा अति भ्रष्ट झालीस.

  20. “मानवपुत्रा, इस्राएलाच्या वडिलांशी बोल आणि त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्याकडून विचारपूस करण्यास तुम्ही आला आहात काय? माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’

  21. कारण त्यांनी माझ्या नियमांचा धिक्कार केला आणि माझ्या विधींचे पालन केले नाही आणि माझे शब्बाथ विटाळले. कारण त्यांचे हृदय त्यांच्या मूर्तींकडे लागलेले होते.

  22. जेव्हा तुम्ही तुमच्या भेटी सादर करता, म्हणजेच तुमच्या लेकरांचा अग्नीत यज्ञ करता; तुम्ही तुमच्या मूर्तींमुळे असेच स्वतःला अशुद्ध करीत राहता. अहो इस्राएल लोकहो, तुम्ही माझ्याकडे विचारपूस करावी असे मी होऊ द्यावे काय? सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ, मी तुम्हाला माझ्याकडे विचारपूस करू देणार नाही.

  23. जेव्हा मी दुष्टाला म्हणतो, ‘अरे दुष्टा, तू खचितच मरशील,’ आणि त्या व्यक्तीने आपल्या मार्गांपासून वळावे म्हणून तू सांगत नाहीस, तर ते दुष्ट व्यक्ती त्यांच्या पापामुळे मरतील आणि त्यांच्या रक्तासाठी मी तुला दोषी ठरवेन.

  24. मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो.

  25. मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो.