मुख्य मजकुरावर जा

Watchfulness बद्दल बायबलमधील वचने

167 वचने · 28 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’

  2. “पण वराने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला खरेच सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’

  3. “म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तो दिवस व ती घटका तुम्हाला माहीत नाही.

  4. ते त्यांना म्हणाले, “मरणप्राय दुःखाने माझा आत्मा विव्हळ झाला आहे. तुम्ही येथेच थांबा आणि माझ्याबरोबर जागे राहा.”

  5. यानंतर ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण ते झोपी गेले आहेत असे त्यांना आढळले. पेत्राला त्यांनी म्हटले, “तुम्ही माणसे एक तासभरही माझ्याबरोबर जागे राहू शकला नाही का?

  6. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे.”

  7. ते त्यांना पुन्हा म्हणाले, “तुम्ही जे ऐकता ते नीट ध्यानात घ्या. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल आणि त्यापेक्षा अधिक जास्त तुम्हाला देण्यात येईल.

  8. “तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल आणि माझ्यामुळे तुम्हाला राज्यपाल आणि राजे त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल.

  9. प्रथम शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झालाच पाहिजे.

  10. परंतु जेव्हा ते तुम्हाला धरून नेतील व तुमच्याविरुद्ध खटला सुरू होईल, तेव्हा तुम्ही काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला जे सुचविले जाईल ते बोला. कारण तुम्ही ते बोलणार नाही, तर पवित्र आत्मा बोलेल.

  11. “भाऊ भावाला, पिता आपल्या पोटच्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील.

  12. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील, त्याचे मात्र तारण होईल.

  13. “जेव्हा तुम्ही ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ ज्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, त्या ठिकाणी उभा असलेला पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.

  14. जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता प्रवेश करू नये;

  15. जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये.

  16. गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल!

  17. तरी हे हिवाळ्यामध्ये होऊ नये, म्हणून प्रार्थना करा,

  18. कारण ते दिवस इतके कष्टाचे असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत.

  19. “जर प्रभूने ते दिवस कमी केले नसते, तर कोणी वाचला नसता. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी, ज्यांना त्यांनी निवडले आहे, त्यांच्यासाठी ते कमी केले जातील.

  20. त्या काळात, ‘येथे ख्रिस्त आहे!’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका.

  21. कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील.

  22. म्हणून तुम्ही सावध राहा. मी तुम्हाला आधी सर्वकाही सांगून ठेवलेले आहे.

  23. “तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाच माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे.

  24. सावध असा! जागृत राहा! ती वेळ केव्हा येईल, हे तुम्हाला माहीत नाही!

  25. हे एका दूरच्या प्रवासावर निघालेल्या मनुष्यासारखे आहे: तो आपले घर सोडतो, त्याच्या दासांना अधिकार देतो, प्रत्येकाला ज्याचे त्याचे काम वाटून देतो आणि तो परत येईपर्यंत बारकाईने लक्ष ठेवावे, असे द्वारपालाला सांगतो.