मुख्य मजकुरावर जा

Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने

61 वचने · 68 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल; माझी आशा त्यांच्यापासून आहे.

  2. अगदी थकून जाईपर्यंत मी मदतीसाठी आक्रोश केला आहे; माझा घसा कोरडा झाला आहे. आपल्या परमेश्वराची वाट पाहत, माझे डोळे थकले आहेत.

  3. निर्धारित वेळेवर अन्न मिळण्यासाठी, प्रत्येक प्राणी आशेने तुमच्याकडे बघतो.

  4. जेव्हा तुम्ही त्यांना पुरविता, तेव्हा ते गोळा करतात; तुम्ही आपला हात पूर्णपणे उघडता आणि तुमच्या विपुल पुरवठ्याने ते तृप्त होतात.

  5. जसा एखादा दास आपली दृष्टी आपल्या धन्याच्या हाताकडे लावतो, किंवा एखादी दासी आपल्या धनिणीच्या हाताकडे नजर लावते, तसेच दया आणि कृपा प्राप्त व्हावी म्हणून, आमची दृष्टी आमचे परमेश्वर याहवेहकडे लागलेली असते.

  6. मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.

  7. पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.

  8. सर्वांची दृष्टी तुमच्याकडे लागलेली असते आणि प्रत्येकास योग्य वेळेवर तुम्ही अन्य पुरवठा करता.

  9. तुम्ही आपला हात उघडता आणि प्रत्येक जीवित प्राण्यांची सर्व इच्छा पूर्ण करता.

  10. “वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस. याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील.

  11. मी याहवेहची वाट पाहीन जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन.

  12. त्या दिवशी लोक असे म्हणतील, “निश्चितच, हे आमचे परमेश्वर आहेत; आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला वाचविले. हे याहवेह आहेत, आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला; चला आपण त्यांच्या तारणात आनंद आणि हर्षोल्हास करू या.”

  13. होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना, आम्ही तुमची वाट पाहतो; तुमचे नाव आणि किर्ती हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.

  14. तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात; त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील. कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत. धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!

  15. हे याहवेह, आम्हावर कृपा करा; आम्ही तुमची आस धरलेली आहे. रोज सकाळी तुम्ही आमचे सामर्थ्य व्हा, संकटाच्या वेळी आमचे तारण व्हा.

  16. पण जे याहवेहवर आशा ठेवतात ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात, ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील; ते धावतील पण दमणार नाहीत, ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.

  17. पृथ्वीवर नीतिमत्वाचे अधिराज्य स्थापेपर्यंत, तो अडखळणार नाही किंवा निराश होणार नाही त्याच्या शिक्षणावर द्वीपही आशा ठेवतील.”

  18. राजे तुला उपपित्यासमान होतील, व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील. ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील; आणि तुझी पायधूळ चाटतील. तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल. माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.”

  19. निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात; सर्वात पुढे तार्शीशची गलबते आहेत, तुझी लेकरे दूरवरून तुझ्याकडे आणत आहेत, त्यांनी आपले चांदी व सोनेही बरोबर आणले आहे, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह, आमच्या परमेश्वराला गौरविण्यासाठी त्यांनी तुला ईश्वरदत्त तेजस्विता बहाल केली आहे.

  20. प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही, कोणत्याही कानावर ते पडले नाही, कोणीही तुमच्याशिवाय इतर कोणताही परमेश्वर कधी पाहिला नाही जो, जे त्यांची आशेने वाट पाहतात, त्यांच्यावतीने कार्य करतात.

  21. या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता.

  22. जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.

  23. याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे.

  24. धन्य ते जे 1,335 दिवस वाट पाहत राहतील आणि शेवट पाहतील.

  25. पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे; प्रीती आणि न्यायाचे पालन कर आणि सतत आपल्या परमेश्वराची प्रतीक्षा कर.