Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“हे याहवेह, मी तुमच्या तारणाची वाट पाहत आहे.
त्याला दोन पत्नी होत्या; एकीचे नाव हन्नाह आणि दुसरीचे नाव पनिन्नाह असे होते. पनिन्नाहला मुलेबाळे होती, परंतु हन्नेहला एकही मूल नव्हते.
जो कोणी तुमच्यावर आशा धरतो, तो कधीही लज्जित होणार नाही. पण जे विनाकारण उपद्रव देतात, ते सर्वजण लज्जित होतील.
मला तुमच्या सत्यामध्ये चालवा आणि शिक्षण द्या; कारण मला तारणारे परमेश्वर तुम्हीच आहात, आणि दिवसभर माझी आशा तुम्हामध्ये आहे.
सात्विकपणा व सरळपणा माझे रक्षण करो, कारण याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे.
याहवेहची प्रतीक्षा कर; हिंमत बांध, धैर्य धर; आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.
आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत; केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत.
याहवेहसमोर निश्चिंत राहा व धीराने त्यांची वाट पाहा; जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते, त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.
दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे. परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.
तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू? माझी सर्व आशा तुमच्या ठायी आहे.
माझ्या पातकांपासून माझे रक्षण करा; मला मूर्खांच्या थट्टेचा विषय होऊ देऊ नका.
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मी धीराने याहवेहची वाट पाहिली; तेव्हा त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले आणि माझी आरोळी ऐकली.
कारण तुम्ही जे काही केले त्याबद्दल तुमच्या विश्वासू लोकांसमक्ष मी सदासर्वकाळ तुमची स्तुती करेन. आणि मी तुमच्या नावाची आशा करेन, कारण तुमचे नाव चांगले आहे.
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीदाला ठार करण्याच्या उद्देशाने शौलाने त्याचा घरावर पाळत ठेवण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा ही घटना घडली. हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा; जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.
दुष्कर्म करणार्यांपासून आणि या रक्तपिपासू लोकांपासून माझा बचाव करा.
पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत! याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.
मी काही चुकीचे केले नसले तरी ते माझ्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत. हे परमेश्वरा, उठा, माझ्या कष्टांकडे पाहा आणि मला साहाय्य करा.
याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या परमेश्वरा, जागृत होऊन सर्व राष्ट्रांना दंड करा. या दुष्ट, विश्वासघातकी लोकांना दयामाया दाखवू नका. सेला
संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरत हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.
ते त्यांच्या तोंडातून काय ओकतात ते पाहा. त्यांच्या तोंडातील शब्द तलवारीसारखे धारदार आहेत आणि ते विचारतात, “आम्हाला कोण ऐकू शकेल?”
याहवेह, तुम्ही त्यांच्यावर हसता; तुम्ही सर्व राष्ट्रांचा उपहास करता.
तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन; कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात.
तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात. परमेश्वर माझ्यापुढे जातील, मग मी माझ्या निंदकांवर समाधानतेने उपहासात्मक दृष्टी टाकू शकेन.
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनाच्या चालीवर आधारित. दावीदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.
फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण; तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.