मुख्य मजकुरावर जा

Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने: Specially in adversity

10 वचने · 68 पैलू

"Waiting Upon God" साठी शोधा

Specially in adversity बद्दल वचने

  1. संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीदाला ठार करण्याच्या उद्देशाने शौलाने त्याचा घरावर पाळत ठेवण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा ही घटना घडली. हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा; जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.

  2. दुष्कर्म करणार्‍यांपासून आणि या रक्तपिपासू लोकांपासून माझा बचाव करा.

  3. पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत! याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.

  4. मी काही चुकीचे केले नसले तरी ते माझ्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत. हे परमेश्वरा, उठा, माझ्या कष्टांकडे पाहा आणि मला साहाय्य करा.

  5. याहवेह, सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या परमेश्वरा, जागृत होऊन सर्व राष्ट्रांना दंड करा. या दुष्ट, विश्वासघातकी लोकांना दयामाया दाखवू नका. सेला

  6. संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरत हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.

  7. ते त्यांच्या तोंडातून काय ओकतात ते पाहा. त्यांच्या तोंडातील शब्द तलवारीसारखे धारदार आहेत आणि ते विचारतात, “आम्हाला कोण ऐकू शकेल?”

  8. याहवेह, तुम्ही त्यांच्यावर हसता; तुम्ही सर्व राष्ट्रांचा उपहास करता.

  9. तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन; कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात.

  10. मी याहवेहची वाट पाहीन जे त्यांचे मुख याकोबाच्या वंशजांपासून लपवित आहेत. मी त्यांच्यावर माझा भरवसा ठेवेन.