मुख्य मजकुरावर जा

Waiting Upon God बद्दल बायबलमधील वचने

61 वचने · 68 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील.

  2. कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते; ते अंत समयाबद्धल बोलते आणि ते खोटे ठरत नाही. जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा; ते निश्चितच येईल आणि त्याला उशीर होणार नाही.

  3. याहवेह जाहीर करतात, “म्हणून माझी वाट पाहा, त्या दिवशी मी दोषारोप करण्यास उभा राहीन. पृथ्वीवरील सर्व राज्ये व राष्ट्रे एकत्र करण्याचा मी निर्धार केला आहे आणि त्यांच्यावर माझ्या कोपाचा वर्षाव करेन; माझ्या अत्यंत तीव्र क्रोधाग्नीने आणि माझ्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण विश्व जळून भस्म होईल.

  4. सभेचा एक सन्मान्य सभासद अरिमथियाकर योसेफ, स्वतः जो परमेश्वराच्या राज्याची वाट पाहत होता, तो धैर्य करून पिलाताकडे गेला आणि त्याने येशूंचे शरीर मागितले.

  5. यरुशलेम येथे शिमोन नावाचा एक मनुष्य होता, तो नीतिमान आणि भक्तिमान होता व इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत असून पवित्र आत्मा त्याजवर होता.

  6. अशा सेवकांसारखे असावे की, जे त्यांचा धनी लग्नाच्या मेजवानीवरून परत येईल म्हणून वाट पाहत आहेत, यासाठी की जेव्हा तो येतो आणि दार ठोठावतो त्याक्षणीच त्याच्यासाठी दार उघडावे.

  7. अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेल्या ज्या देणगीबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा.

  8. यास्तव तुम्ही आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना आध्यात्मिक दानाची तुम्हाला काहीच उणीव पडलेली नाही.

  9. आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत.

  10. आणि परमेश्वराचा पुत्र येशू ज्यांना त्यांनी मृतांतून पुनरुत्थित केले, जे येणार्‍या क्रोधापासून, आपल्याला सोडवितात त्यांची स्वर्गातून येण्याची तुम्ही वाट पाहात आहात.

  11. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूचे आगमन होईपर्यंत धीर धरा. पाहा शेतकरी कसा जमिनीतून निघणार्‍या मोलवान पिकांची वाट पाहतो. शरद आणि वसंतामध्ये येणार्‍या पावसाची धीराने वाट पाहतो.