मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Christ बद्दल बायबलमधील वचने

138 वचने · 117 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा, सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा. उठा, पूर्वी जसे जागे झाले होते, पुरातन पिढीत जसे उठले होते. नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का, त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का?

  2. पाहा, माझा सेवक सुज्ञतेने वागेल; तो उच्च केला जाईल व उत्कर्ष पावेल आणि त्याचे मोठे गौरव होईल.

  3. आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?

  4. पाहा, मी त्याला लोकांसमोर साक्षीदार, एक शासनकर्ता व लोकांचा अधिकारी बनविले.

  5. “याकोबातील ज्या लोकांनी आपल्या पापाबद्दल पश्चात्ताप केला आहे, सीयोनात त्यांचा उद्धारक येईल,” अशी याहवेह घोषणा करतात.

  6. तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील आणि तुला राजांचे स्तनपान करविण्यात येईल. तेव्हा तुला कळेल कि मी, याहवेह तुझा उद्धारकर्ता मी तुझा तारणारा, याकोबाचा सर्वसमर्थ आहे.

  7. त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.

  8. याहवेह म्हणतात, “असे दिवस येत आहेत की, त्या समयी मी दावीदातून एक नीतिमान शाखा पुन्हा उगवेन, तो राजा सर्व देशात सुज्ञतेने, खरेपणाने आणि न्यायाने राज्य करेल.

  9. तेव्हा यहूदीयाचे रक्षण होईल आणि इस्राएल सुरक्षिततेने जगेल. याहवेह आमचे नीतिमान तारणकर्ता या नावाने त्यांना संबोधित करण्यात येईल.

  10. याउलट, ते व दावीद, त्यांचा राजा, ज्याला मी त्यांच्यातून उभारेन, ते त्यांचे परमेश्वर याहवेहची सेवा करतील!

  11. मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल.

  12. आपल्या पिकासाठी प्रसिद्ध असणारा देश मी त्यांना देईन आणि यापुढे ते देशात दुष्काळाने पीडित होणार नाहीत किंवा राष्ट्रांची थट्टा त्यांना सोसावी लागणार नाही.

  13. “हे जाणा आणि समजून घ्या: यरुशलेमची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सात ‘सप्तके’ आणि बासष्ट ‘सप्तके’ निश्चित केली आहेत. ते शब्द बाहेर येण्यापासून तो अभिषिक्त शासनकर्ता होईपर्यंतचा वेळ ठरविला आहे. अडचणीच्या वेळी रस्त्यावर आणि खंदकाने पुन्हा बांधले जाईल,

  14. हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा, कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे. ते काठीने इस्राएलाच्या शासकाच्या गालावर मारतील.

  15. “परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलचा शासक उदय पावेल, ज्याची उत्पत्ती प्राचीन काळातील आहे.”

  16. मी सर्व राष्ट्रे हलवेन आणि सर्व राष्ट्रांची जी इच्छा आहे ते येईल आणि मी गौरवाने हे स्थान भरेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  17. “ ‘ऐक, हे प्रमुख याजका यहोशुआ, तू आणि तुझ्याबरोबर बसलेले तुझे सहकारी, जे भावी काळाची चिन्हे आहेत: मी माझा सेवक, शाखा आणणार आहे.

  18. त्याला सांग की सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हा तो पुरुष आहे, ज्याचे नाव “शाखा” आहे, जो त्याच्या ठिकाणापासून शाखा काढेल आणि याहवेहचे मंदिर बांधेल.

  19. सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!

  20. “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”

  21. “मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  22. परंतु तुम्ही जे माझे नाव सन्माननीय मानता, त्या तुम्हासाठी नीतिमत्वाचा सूर्य उगवेल आणि त्याच्या किरणात आरोग्य असेल. मग तुम्ही बाहेर जाल व धष्टपुष्ट वासरांप्रमाणे बागडाल.

  23. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”

  24. “कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).

  25. ते विचारू लागले, “ज्यांचा जन्म झाला आहे ते यहूद्यांचे राजे कुठे आहेत? आम्ही त्यांचा तारा पाहिला आणि त्यांची उपासना करावयास आलो आहोत.”