Titles and Names of Christ बद्दल बायबलमधील वचने: Angel
Angel बद्दल वचने
ज्या परमेश्वराच्या दूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, ते या मुलांना आशीर्वादित करोत. माझे आणि माझे पूर्वज अब्राहाम आणि इसहाक यांचे नाव या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो, त्यांना पुष्कळ मुलेबाळे व गोत्र लाभोत.”
“पाहा, मार्गात तुझे रक्षण करावे व जो देश मी तुमच्यासाठी तयार करून ठेवला आहे, त्यात तुम्हाला घेऊन यावे म्हणून तुमच्यापुढे मी एक दूत पाठवित आहे.
त्याच्यापुढे सावध असा आणि तो जे काही सांगेल ते ऐका. त्याच्याविरुद्ध बंड करू नका; तो तुझ्या अपराधांची क्षमा करणार नाही, कारण माझे नाव त्याच्यामध्ये आहे.