मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of Christ बद्दल बायबलमधील वचने

138 वचने · 117 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “लावदिकीया येथील मंडळीच्या देवदूताला लिही: जे आमेन आहेत, विश्वासू व खरे साक्षी आणि परमेश्वराच्या सृष्टीचे शासक आहेत, ते असे म्हणतात.

  2. पण त्या चोवीस वडिलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! कारण पाहा, यहूदाह वंशाचा सिंह, दावीदाचा मूळ विजयी झाला आहे. सातही शिक्के फोडून ती गुंडाळी उघडण्यास तो समर्थ आहे.”

  3. मग मी पाहिले, ते राजासन, ते चोवीस वडीलजन व ते चार सजीव प्राणी यांच्या मध्यभागी वध झाल्यासारखा कोकरा उभा असलेला मला दिसला. कोकर्‍याला सात शिंगे, सात डोळे, असून, ते जगाच्या प्रत्येक भागात पाठविलेले परमेश्वराचे सात आत्मे आहेत.

  4. ते मोठ्याने म्हणत होत: “ज्यांचा वध करण्यात आला होता, तो कोकरा सामर्थ्य, संपत्ती, सुज्ञता, बल, सन्मान, गौरव आणि उपकारस्तुती स्वीकारण्यास पात्र आहे!”

  5. पृथ्वीवरील ते सर्व लोक ज्यांची नावे जगाच्या उत्पत्तीपासून वधलेल्या कोकराच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत ते त्या पशूची उपासना करतील.

  6. ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!

  7. ते सर्वजण मिळून कोकर्‍या विरुद्ध युद्ध पुकारतील. परंतु कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल, कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे आणि त्यांनी पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू अनुयायी त्यांच्याबरोबर असतील.”

  8. त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते.

  9. नगरीत कुठे मंदिर दृष्टीस पडत नव्हते, कारण सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आणि कोकरा हेच तिथे मंदिर होते.

  10. तिथे कोणतेही शाप असणार नाही, कारण परमेश्वराचे व कोकर्‍याचे सिंहासन त्या शहरात असेल आणि त्यांचे सेवक त्यांची सेवा करतील.

  11. नंतर तो देवदूत मला म्हणाला, “ही वचने सत्य व विश्वसनीय आहेत आणि संदेष्ट्यांना अंतःस्फूर्ती देणाऱ्या प्रभू परमेश्वरांनी ज्यागोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या त्यांच्या सेवकांना कळविण्यासाठी त्यांच्या दूताला पाठविले आहे.”

  12. मीच अल्फा व ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आदि व अंत आहे.

  13. “तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी येशूने, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”