मुख्य मजकुरावर जा

The Tribes of Israel बद्दल बायबलमधील वचने

241 वचने · 21 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “योसेफ हा फलवंत वेल आहे, पाण्याच्या झर्‍याजवळ लावलेली फलवंत वेल आहे, तिच्या फांद्या भिंतीवर पसरल्या आहेत.

  2. कटुतेने तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याच्यावर वैराने बाण सोडले.

  3. परंतु त्याचे धनुष्य स्थिर राहिले, त्याचे बाहू मजबूत राहिले, याचे कारण याकोबाचे सर्वसमर्थ परमेश्वर, ते मेंढपाळ आणि इस्राएलचे खडक आहेत.

  4. कारण तुझ्या पित्याचे परमेश्वर, तुझे सहायक आहेत, कारण सर्वसमर्थ, जे तुला आशीर्वादित करतात, वरून स्वर्गातील आशीर्वाद, खोलातील डोहातून निघणार्‍या झर्‍यातील आशीर्वाद, स्तने आणि गर्भांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो.

  5. तुझ्या पित्याचे आशीर्वाद पूर्वजांच्या पर्वतापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहेत, ते सर्वकालीन पर्वतांच्या संपन्नतेपेक्षा श्रेष्ठ आहेत. हे आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी, जो आपल्या भावामधील राजपुत्र आहे, त्याच्या मस्तकी येवोत.

  6. “बिन्यामीन, हा भुकेला लांडगा आहे; तो सकाळच्या प्रहरी शिकार करतो, आणि संध्याकाळी लूट वाटतो.”

  7. हे सर्व इस्राएलचे बारा गोत्र आहेत आणि मुलांना आशीर्वाद देण्याकरिता त्यांचा पिता असा बोलला, प्रत्येकाला त्याने यथायोग्य आशीर्वाद दिला.

  8. इस्राएल लोकांनी रामसेस पासून ते सुक्कोथ पर्यंत प्रवास केला. स्त्रिया व लेकरे या खेरीज सुमारे सहा लाख पुरुष पायी चालणारे होते.

  9. इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने असावीत, प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले जावे.

  10. इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने होती. प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले.

  11. “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.

  12. प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.

  13. “तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;

  14. शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;

  15. यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;

  16. इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल;

  17. जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;

  18. योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;

  19. बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;

  20. दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;

  21. आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;

  22. गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;

  23. नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”

  24. हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.

  25. मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्‍यांनी मोजलेले पुरुष ते हेच.