Skip to content

The Scriptures बद्दल बायबलमधील वचने

159 वचने · 108 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे, सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे, याहवेहची वचने शुद्ध आहेत.

  2. जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले.

  3. याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत; ते आत्म्याला ताजेतवाने करतात. याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत, ते भोळ्यांना सुज्ञ करतात.

  4. याहवेहचे नियम योग्य आहेत, ते हृदयास आनंद देतात, याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत, त्या नेत्रांना प्रकाश देतात.

  5. सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत, अतिशुद्ध सोन्यापेक्षाही; ते मधापेक्षा मधुर आहेत, पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत.

  6. कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात; त्याचे पालन करणार्‍यास मोठे प्रतिफळ मिळते.

  7. तेव्हा मी म्हणालो, “पाहा मी येथे आहे, आलो आहे— शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे.

  8. तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील? ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.

  9. मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत, जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.

  10. हे याहवेह, तुमचे स्तवन होवो; तुमचे विधी मला शिकवा.

  11. तुमच्या मुखातून निघालेले सर्व नियम आपल्या ओठांनी मी त्या सर्वांची पुनरुक्ती करतो.

  12. मी तुमच्या नियमांनी हर्षित होतो; मी तुमच्या वचनांची उपेक्षा करणार नाही.

  13. मी पूर्णपणे निरुत्साही होऊन धुळीत पडून आहे; तुम्ही आपल्या वचनानुसार माझ्या जीवनाचे जतन करा.

  14. दुःखाने मी हतबल झालो आहे; तुमच्या वचनांद्वारे मला सशक्त करा.

  15. हे याहवेह, तुमच्या विधींचे मला शिक्षण द्या, जेणेकरून शेवटपर्यंत मी त्याचे पालन करावे.

  16. हे याहवेह, तुमची अक्षय प्रीती मला प्रगट होऊन तुमच्या अभिवचनानुसार मला तारण प्राप्त होवो;

  17. मग मला टोचून बोलणार्‍यांना मी उत्तर देईन, कारण तुमच्या अभिवचनांवर मी विश्वास ठेवतो.

  18. तुमच्या सेवकाला दिलेल्या अभिवचनाचे स्मरण करा, कारण तुम्हीच मला आशा दिली आहे;

  19. माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.

  20. तुम्ही मला ज्ञान व विवेक शिकवा, कारण तुमच्या आज्ञांवर माझा पूर्ण विश्वास आहे.

  21. पीडित होण्याआधी मी पथभ्रष्ट झालो होतो, पण आता तुमचे वचन मी पाळतो.

  22. जे तुमचे भय धरतात ते सर्वजण मला बघून उल्हासित होवोत, कारण मी तुमच्या वचनावर आशा ठेवली आहे.

  23. तुमच्या अभिवचनानुसार तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो;

  24. तुम्ही केलेल्या तारणप्राप्तीसाठी माझा जीव उत्कंठित झाला आहे, पण तुमच्या वचनावर मी आशा ठेवतो.

  25. तुमच्या अभिवचनपूर्तीची वाट पाहून माझे डोळे शिणले आहेत; मी म्हणतो, “तुम्ही माझे सांत्वन केव्हा करणार?”