The Scriptures बद्दल बायबलमधील वचने: Reveal the laws, statutes, and judgments of God
Reveal the laws, statutes, and judgments of God बद्दल वचने
मग मोशेने जाऊन याहवेहचे शब्द व नियम लोकांना सांगितले, त्यांनी एका आवाजात प्रतिसाद देत म्हटले, “याहवेहने जे सर्वकाही सांगितले त्याप्रमाणे आम्ही करू.”
मग याहवेहने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व त्याने लिहून ठेवले. दुसर्या दिवशी अगदी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा गोत्रानुसार बारा खांब उभे केले.
पाहा, मी तुम्हाला याहवेह माझ्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दिलेले विधी व नियम यासाठी शिकविले की जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुमचा प्रवेश होईल, त्यावेळी ते तुम्ही पाळावे.
आणि त्यावेळी याहवेहने मला आज्ञा केली की तुम्ही यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेणार आहात तिथे तुम्हाला जे विधी व नियम पाळायचे आहेत ते शिकवावे.